जिद्द: वयाच्या 66 व्या वर्षी पदवी. शमुवेल बोर्डे हे एल एल बी उत्तीर्ण. पोस्टमास्तर म्हणून सेवानिवृत

 
अहमदनगर: भारतीय डाक विभागात पोस्टमास्तर बारामती यापदावरून 2017 मध्ये सेवानिवृत्ती घेतल्यानंतर 2023 मध्ये एल एल बी च्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होत पदवी प्राप्त केली.
मूळचे देसवंडी ता राहुरी येथील रहिवासी असणारे श्री बोर्डे यांनी आपले शिक्षण पूर्ण झालेनंतर 1982 मध्ये नेवासा येथून आपल्या डाकसेवेस प्रारंभ केला.
काही दिवसातच त्यानी *सेनाडाक* सेवेत जाणे पसंद केले,1987 ते 1996 पर्यंत सेना डाक सेवेत *वॉरंट ऑफिसर* म्हणून  देशभरातील अनेक सेना डाक सेवेत अनेक शहरात  त्यानी सेवा केली. 
त्यानंतर ते पुन्हा भारतीय डाक विभागात आले.
सर्कल ऑफिस मुंबई येथे वेल्फेअर इन्स्पेक्टर ,श्रीरामपुर, अहमदनगर, शिवाजीनगर पुणे येथे  पोस्टमास्तर म्हणून प्रभावीपणे काम केल्यानंतर त्याच्याकडे  पोस्टमास्तर बारामती  जबाबदारी देण्यात आली.यापदी कार्यरत असतानाच ते 2017 मध्ये सेवानिवृत्त झाले.
एकूण पस्तीस वर्ष डाक सेवेत त्यानी प्रभावीपणे  काम पाहिले. अत्यंत संयमी,अभ्यासु अधिकारी म्हणून त्याची राज्यभर ओळख आहे.
सेवानिवृतीनंतर घरात स्वस्थ न बसता त्यानी एल एल बी साठी ऍडमिशन घेण्याचा निर्णय घेतला व नुकताच जाहीर झालेल्या अंतिम परीक्षेत वयाच्या 66व्या वर्षी त्यानी पदवी प्राप्त केली.
त्याबदल पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव, सेवानिवृत्त प्रवर अधिक्षक श्री वाय पी साळवे,श्री के एम कुमठेकर,श्री रामभाऊ लांडगे,श्री तुकाराम ढवळे,नामदेव डेंगळे,श्री संदिप कोकाटे,श्री कमलेश मिरगणे,श्री सागर कलगुंडे, श्री तान्हाजी सूर्यवंशी,श्री प्रदिप सूर्यवंशी,सुनिल थोरात यांच्यासह अनेकांनी त्याचे अभिनंदन केले.
----------------------------------------
चौकट:
सेवाकाळात सततच्या व्यस्ततेमुळे इच्छा असूनही काही बाबी पूर्ण करू शकलो नाही,त्या बाबी सेवानिवृती नंतर पूर्ण करण्याचा निश्चय केला होताच, त्यामधील ही महत्वाची बाब मी वयाच्या 66 व्या वर्षी मी एल एल बी पदवी प्राप्त करत पूर्ण करू शकलो यांचा मनस्वी आनंद वाटतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post