नगर तालुक्यातील मांडवे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी संदिप उद्योग समूहाचे प्रमुख महादेव निक्रड यांची तर उपाध्यक्ष पदी छाया विलास निमसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.मांडवे सेवा सोसायटी ही तालुक्यात नावलौकिक मिळविलेली सेवा संस्था.सभासद हिताचे निर्णय घेतले जातील आणि सेवा सोसायटीच्या प्रगती साठी प्रयत्न केले जातील, असे नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी निवडीनंतर बोलताना आपले मनोगत व्यक्त केले. नूतन पदाधिकाऱ्यांचा नगर तालुका बाजार समितीचे विद्यमान संचालक तथा सरपंच सुभाष निमसे, माजी संचालक बाळासाहेब निमसे, उपसरपंच संजय निमसे, सेवा सोसायटी चे माजी अध्यक्ष पंढरीनाथ निमसे सर, माजी उपाध्यक्ष गंगाधर निक्रड, संचालक डॉ. दत्तात्रय निक्रड, बाळासाहेब निमसे, शिवाजी निमसे, पत्रकार ज्ञानेश्वर निमसे ( संचालक ) , जनार्दन गांगर्डे आदींनी सत्कार केला.नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री, माजी आमदार शिवाजी कर्डिले, विद्यमान खासदार सुजय दादा विखे, आमदार बबनदादा पाचपुते यांनी निवडीनंतर अभिनंदन केले
Post a Comment