अहमदनगर: अहमदनगर डिस्ट्रिक्ट नॅशनल पोस्टल को ऑप क्रेडिट सोसायटीची स्थापना 2016 मध्ये झाली असून संस्थेचे आजवरचे निर्णय हे सभासदहितास प्राधान्य देणारे असल्यानेच अल्पावधीतच संस्था स्वभाडवलाकडे वाटचाल करत असून,आजवर संस्था आपल्या उपलब्ध निधीमधून कमीत कमी व्याजदरात आपल्या सभासदांना कर्ज उपलब्ध करत असून, त्यामुळेच या संस्थेची ओळख स्वभाडवली संस्था म्हणून होत आहे, असे गौरवोदगार पोस्टल संघटनेचे राज्यउपाध्यक्ष संतोष यादव यांनी व्यक्त केले.
अहमदनगर डिस्ट्रिक्ट नॅशनल पोस्टल को ऑप क्रेडिट सोसायटीची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा राज पॅलेस कॉन्फरन्स हॉल याठिकाणी संस्थेचे चेअरमन श्री नामदेव डेंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. संस्थेचे कार्यकारी संचालक श्री राधाकिसन मोटे पाटील यांनी सभेची नोटीस व आर्थिक पत्रके सभागृहापुढे ठेवली.
संस्थेचे जेष्ठ सभासद श्री संतोष यादव यांनी संस्थेच्या आर्थिकपत्रकाविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन करत, संस्थेकडे आज अखेर कॅशक्रेडिट नसतानाही संस्था उपलब्ध निधीमधून आपल्या सभासदास अधिकाधिक कर्ज,अत्यंत अल्पव्याजदरात उपलब्ध करून देत असून सातत्याने सभासदहितास प्राधान्य देत संचालक मंडळ काम करत आहे. आजच्या सभेत कर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय हा निश्चितच सभासदास हिताचा असून हा निर्णय स्वागतार्ह आहे , कमीत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणारी संस्था म्हणून एक आदर्श संस्था म्हणून आपला नावलौकिक निर्माण केला आहे हे संस्थेच्या दृष्टीने अत्यंत गौरवशाली बाब आहे. यापुढे हे संचालक मंडळ असेच कामकाज करेल अशी अपेक्षा केली.
सर्व उपस्थित सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करत,व्याजदरातील कपात व ग्रामीण डाकसेवकास सभासदत्व देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.
याप्रसंगी श्री रामभाऊ लांडगे,श्री अमित देशमुख,गणेश धनक, सचिन गायकवाड,श्री वाय पी साळवे ,के एम कुमठेकर,एस डी बोर्डे यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी श्री एस डी बोर्डे यांनी वयाच्या 66 व्या वर्षी एल एल बी परीक्षेत यश मिळवल्याबदल,तर श्री सतिष रायकवाड यांची कन्या कु वैष्णवी हिने सीए परीक्षेत यश मिळवल्याबदल विशेष गौरव करण्यात आला.
संस्थेशी संबधीत असणारे दोघांनी यापुढील काळात संस्थेस मार्गदर्शन करावे,अशी अपेक्षा व्यक्त केली ,श्री बोर्डे यांनी संस्थेसाठी कायदेविषयक सल्लागार म्हणून मार्गदर्शन करावे अशी विनंती करताच त्यानी ही जबाबदारी स्वीकारली.
संस्थेचे चेअरमन श्री नामदेव डेंगळे,संघटनेचे नेते संतोष यादव ,संदिप कोकाटे,एस डी बोर्डे,अमित देशमुख,रामभाऊ लांडगे,वाय पी साळवे,के एम कुमठेकर,यांचे हस्ते सभासदाच्या पस्तीस गुणवंत पाल्याचा गौरव व सेवानिवृत्त सभासद श्रीमती निलिमा कुलकर्णी, श्रीमती जे पी गटणे यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेव डेंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजवर आपण सर्वांनी जे सहकार्य केले त्यामुळे संस्था नेत्रदीपक प्रगती करू शकली,हे नमूद करत सर्वाना धन्यवाद देत,आजच्या सभेत घेतलेले सर्व निर्णयाची अंमलबजावणी संचालक मंडळ निश्चितच करील,व्याजदरातील कपात ही ऑगस्टपासून,व ग्रामीण डाक सेवकास सभासदत्व देण्याच्या निर्णयाचे,त्याचे कर्जविषयक धोरण, मासिक वर्गणी यास सहकार नियमानुसार निर्णय घेत संचालक मंडळ तात्काळ अंमलबजावणी सुरू करील. आजपर्यंत आपण सर्वाना जे सहकार्य केले त्याबद्ल धन्यवाद देत,आगामी काळात असेच सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी संचालक श्री सचिन गायकवाड, राधाकिसन मोटे, रावसाहेब चौधरी,प्रकाश कदम ,प्रदिप सूर्यवंशी,संजय बोदर्डे, तान्हाजी सूर्यवंशी,श्री पी ए चौगुले,श्रीमती जे पी गटणे, व्यवस्थापक श्री लक्ष्मीकांत दंडवते,नितीन थोरवे,दिपक नागपुरे,दिपक कुंभारे,सुनिल थोरात,सागर कलगुंडे,विजय दरदले,निलिमा कुलकर्णी, वासंती नगरकर,आश्विनी चिंतामणी, सविता ताकपेरे,मोनाली हिंगे, प्रियांका भोपळे,वंदना नगरकर,धनंजय दैठणकर, किशोर नेमाने, सागर पंचारिया,प्रितम वराडे,अशोक बंडगर,आसिफ शेख,भाऊसाहेब जाधव, यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमात स्वागत गीत सौ वंदना नगरकर यांनी सादर केले.
प्रास्ताविक प्रदिप सूर्यवंशी सूत्रसंचालन बापु तांबे,कमलेश मिरगणे तर आभार प्रकाश कदम यांनी केले.
Post a Comment