इंजि.डी.आर.शेंडगे एक सामाजिक जाण व तळमळ असणारे व्यक्तिमत्त्व आहे.आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी केलेली सामाजिक काम जाणुन घेणे आवश्यक आहे.एक सामान्य मेंढपाळ कुटुंबातुन पुढे येऊन मध्ये शिक्षण घेतले.सरकारी महाविद्यालयात शिक्षण घेऊन नोकरी करत असताना सामाजिक जाणिव ठेवून कित्येक विद्यार्थ्यांना शिक्षण व नोकरी करीता हात दिला.मेंढपाळ बांधवांच्या समस्या जाणून त्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती उंचावण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारा ढाण्या वाघ.धनगर आरक्षणासाठी पारनेर तहसिल ला मोठ्या संख्येने समाजाला जागृत करुन निवेदन दिले जेणेकरून समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे व सुविधा मिळाल्या पाहिजेत तसेच तरूणांना शिक्षण व नोकरीत फायदा मिळेल. आरक्षण असो की समाजाचे कोणतेही प्रश्न असोत ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.कोरोना काळात कोकण पर्यंत मेंढपाळ बांधवांना मदत व किराणा पोहोचविण्याचे कार्य केले.
आज वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून शुभेच्छांचा वर्षाव मोठ्या प्रमाणात होत आहे.या नेतृत्वामुळे मेंढपाळ बांधावावर होणारे अत्याचार व अन्याय्य थांबता आहे.धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ते राज्यभर मदत लागेल तेथे पोहचत आहेत.खुप कष्टातून हा नेता राज्यस्तरीय भरारी घेत आहे. अशा या लढाऊ, उमद्या, सुशिक्षित व सुसंस्कृत नेतृत्वास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
Post a Comment