प्रवर डाक अधिक्षकपदी सुरेश बन्सोडे*

 



अहमदनगर:  सुरेश बन्सोडे यांची प्रवर अधिक्षक डाकघर अहमदनगर पदी नियुक्ती झाली असून त्यानी आपला पदभार स्वीकारला. 
यापदी कार्यरत असणाऱ्या  श्रीमती हनी गंजी यांची नुकतीच विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे बदली झाल्याने हे पद रिक्त होते.
 सुरेश बन्सोडे हे मूळचे बीड येथील असून यांनी आपल्या डाकसेवेस बीड विभागातील माजलगाव पोस्टऑफिस मधून डाकसहायक या पदापासून केली.बीड प्रधान डाकघर येथे कार्यरत असताना खातेअंतर्गत परीक्षा उत्तीर्ण होत ते *इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट* यापदी त्याची निवड झाली व डाक निरीक्षक म्हणून धाराशिव येथून त्यानी आपल्या प्रशासकीय सेवेस प्रारंभ केला.उपविभागीय डाक निरीक्षक उमरगा,भुसावळ,रेल्वे मेल सर्व्हिस छत्रपती संभाजीनगर,बीड,धाराशिव,
नाशिक  डाक विभागात त्यानी सक्षमपणे काम पाहिले असून,एक शिस्तप्रिय,अभ्यासु, कामगार प्रिय अधिकारी म्हणून ओळख ओळख आहे.
त्यानी सिनीयर पोस्टमास्तर सुरत (गुजरात) येथे काही काळ काम पाहिल्यानंतर त्याची सिनियर पोस्टमास्तर छत्रपती संभाजी नगर येथे पोस्टिंग झाली.
 मागील वर्षी त्याना छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार संघाचे वतीने दिला जाणारा *युवा गौरव पुरस्कार* देऊन जिल्हाधिकारी मा श्री दिपकजी मुंगळीकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेले होते.
श्री छत्रपती संभाजीनगर येथून त्याची प्रमोशनवर प्रवर अधिक्षक डाकघर अहमदनगर यापदी झाली आहे.
श्री सुरेश बन्सोडे यांनी आपला कार्यभार स्वीकारले बदल नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजचे राज्य उपाध्यक्ष व अहमदनगर विभागाचे नेते श्री संतोष यादव यांनी त्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या, यावेळी त्याचे समवेत श्री संदीप कोकाटे,बापू तांबे,श्री नामदेव डेंगळे,श्री कमलेश मिरगणे, तान्हाजी सूर्यवंशी,प्रदिप सूर्यवंशी, सुनिल थोरात,विजय दरदले,नितीन थोरवे,सागर कलगुंडे, भाऊसाहेब जाधव,नितीन खेडकर,सागर कलगुंडे,सागर पंचारिया,श्रीमती अर्चना भुजबळ,श्रीमती रंजना कदम,आसिफ शेख, आश्विनी चिंतामणी,संतोष घुले, यांचेसह मोठया संख्येने संघटनेचे  सभासद उपस्थित होते.


चौकट:
अहमदनगर विभाग माझेसाठी नवीन असला तरी,विभागाची पुर्णतः माहिती घेऊन,सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेत,सक्षमपणे काम करत अहमदनगर विभाग निश्चितच राज्यभरात अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न करू.; सुरेश बन्सोडे नूतन प्रवर अधिक्षक डाकघर अहमदनगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post