रोटरी इंटरॅक्ट व रोटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून बालपणीच विद्यार्थ्यांमध्ये समाज घडवण्याची ताकद - रो. ईश्वर बोरा.
रोटरी इंटरॅक्ट व रोटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून बालपणीच विद्यार्थ्यांमध्ये समाज घडवण्याची ताकद - रो. ईश्वर बोरा.
डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या प्रांतपाल रो. स्वाती हेरकल यांच्या संकल्पातून विविध शाळेत संबोधन
नगर : रोटरी विश्वात कार्य करत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर रोटरीच्या अनेक क्लबच्या माध्यमातून रोटरी करत असलेल्या अनेक विविध समाजाभिमुख कार्य तसेच रोटरीच्या (7 Area of Focus) सात फोकस एरिया मधील क्षेत्रात बालपणापासूनच विद्यार्थी आयुष्यात असतानाच रोटरी इंटरॅक्ट व रोटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या व्यक्ति पर्यंत (Service Above Self) निस्वार्थ सेवा कार्य करण्याचे भान आणि संकल्प डोळ्यांसमोर ठेवून कार्य करण्याची भावना तसेच भविष्यातील आयुष्यात नेत्तृत्व गुण विद्यार्थांमध्ये रुजविण्याकरिता अहमदनगर शहरातील अग्रगण्य अशा आर्मी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना रोटरी जिल्हा ३१३२ च्या प्रांतपाल रो. स्वाती हेरकल यांच्या पुढाकारातून मार्गदर्शनपर संबोधन रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे यूथ सर्विस (Youth Service) चे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो. ईश्वर बोरा यांनी केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे नूतन अध्यक्ष रो. हरीश नय्यर व मा. सचिव रो. डॉ. कुणाल कोल्हे यांच्या पुढाकारातून व रो. ईश्वर बोरा यांच्या प्रेरणेने व त्यांच्या उस्थितीत आर्मी पब्लिक स्कूलच्या मुख्याधिपिका नूतन मिश्रा मॅडम व को-ऑर्डिनेटर पूजा पाटील मॅडम यांनी आर्मी पब्लुक स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध समाजउपयोगी कार्ये करण्याचे संकल्प करत रोटरी इंटरॅक्ट क्लब स्थापन करण्याची ग्वाही दिली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत रोटरी करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याने भविष्यात रोटारियन्स होण्याचे मानस बोलून दाखवले व समाजाप्रती आपले कर्तव्य सामाजिक कार्य करुन अदा करण्याची भावना व्यक्त केली.
यावेळी बोलताना ईश्वर बोरा यांनी आंतरराष्ट्रीय स्थरावर एकूण १४५ देशात १५ हजार इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून ३लाख ४२ हजार इंटरॅक्टर्स आप आपल्या परीने विविध सामाजिक कार्य करीत असल्याबाबत बोलून दाखवले तसेच अहमदनगर शहरातील कार्यान्वित असलेल्या रोटरी सेंट्रल, रोटरी मिडटाउन, रोटरी प्रियदर्शिनी, रोटरी ई क्लब ऑफ एमपॉवरिंग यूथ, रोटरी डिग्निटी, रोटरी इंटेग्रिटी, रोटरी मेन च्या पुढाकारातून व प्रांतपाल रो. स्वाती हेरकल यांच्या संकल्पनेतून अनेक शाळा, कॉलेज व वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून रोटरी इनेरॅक्ट व रोटरॅक्ट क्लब ची स्थापना केली आहे व रोटरी वर्ष २०२३-२४ मधे मोठ्या प्रमाणावर इंटरक्टर्स व रोट्रॅक्टर्स घडवून अभूतपूर्व असे कार्य त्यांच्या माध्यमातून संपूर्ण डिस्ट्रिक्ट ३१३२ मधे सर्वांनी उल्लेखनीय असे कार्य करत हा रोटरी वर्ष पार पाडण्याचे आव्हान सर्व रोटेरियन्सला तसेच उपस्थित सर्व टीचिंग फॅकल्टीज यांना रोटरी मधे सहभागी होऊन रोटरीच्या २०२३-२४ वर्षाची थीम (Create Hope in the World) जगात आशा निर्माण करा या धर्तीवर जनसमान्यात आपल्या कामाचा ठसा उमटवण्याचे कार्य करण्याचे आव्हान केले. याप्रसंगी आर्मी पब्लिक स्कूल च्या वतीने रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला. याबरोबरच विखे पाटील नरसिंग कॉलेज मधे मुख्याधिपिका डॉ. चांदेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तर डी. पॉल शाळा, वावरथ, ढवळपुरी जवळ, अहमदनगर येथे फादर थॉमस यांच्या पुढाकारातून तसेच जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय मधे मुयाध्यापक श्री. विजय आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली देखील रोटरी इंटरॅक्ट क्लब ची स्थापना करण्यात आली असून डिग्रज, राहुरी येथे रवी पाटेकर यांच्या पुढाकारातून रोटरॅक्ट क्लब स्थापन करण्यात आले आहे.
Post a Comment