महाराजा यशवंतराव होळकर पुणे ते इंदौर शौर्ययात्रेचा नगरमध्ये मुक्काम

महाराजा यशवंतराव होळकर पुणे ते इंदौर 
शौर्ययात्रेचा नगरमध्ये मुक्काम

नियोजन समितीच्या बैठकीत विविध कार्यक्रमांचे नियोजन

     नगर - इंग्रजांना वेगवेगळ्या युद्धात तब्बल 18 वेळा पराभुत करणार्‍या शूर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शौर्ययात्रेचे पुणे ते इंदौर आयोजित करण्यात आले असून, ही यात्रा नगरला 8 मे 2023 रोजी एक दिवस मुक्कामाला थांबणार असून या निमित्त समाज प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती शौर्य यात्रेचे इंदौर येथील मुख्य समन्वयक स्वप्नीलराजे होळकर यांनी दिली.

     नगर येथील नियोजनाच्या बैठकीस मार्गदर्शन करतांना त्यांनी माहिती दिली. यावेळी इंदोर येथील समन्वयक अंकुश भांड, सौरभ बारगळ, रविंद्र भुसारी, किरण जोशी, योगेश धरम, विठ्ठल कडू, गणेश पुजारी, नगरचे राजेंद्र पाचे, काका शेळके, सुभाष भांड, वसंत दातीर, राजेंद्र तागड, निवृत्ती दातीर, प्रा.शरद दलपे, चंद्रकांत तागड, निशांत दातीर, ज्ञानदेव घोडके, ज्ञानेश्वर भिसे, इंजि. डी.आर.शेंडगे, ऋषी ढवण, साहेबराव कजबे, विनय भांड, संतोष गावडे, राजेंद्र नजन, खंडू कजबे, सतिश भुसारी, कल्याण इखे, अशोक जाधव, पांडूरंग दातीर, प्रथमेश तागड, विठ्ठल दातीर, अशोक भिटे, नारायण ढवण, दादा वाडगे, संजीव भोगे, अर्जुन कजबे, अंबदाास पाचे, ज्ञानदेव तागड, विजय कुलाळ आदिंसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     महाराज यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या पुणे येथील शनिवार वाडा येथून 7 मे रोजी ही शौर्य यात्रा सुरु होणार आहे. या शौर्य यात्रेत महाराज यशवंतराव होळकर यांचा ब्रांझ धातूचा आश्वरुढ पुतळा असणार आहे. हा पुतळा या शौर्य यात्रेचे मुख्य आकर्षण राहणार असून, तब्बल सात दिवस प्रवास केल्यानंतर हा पुतळा इंदौर येथील कनाडिया चौकात 13 मे रोजी उभारण्यात येणार आहे.

     पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे असून, कर्मभुमी इंदौर आहे.  त्यामुळे इंदौर येथील संस्थानकडे जाणार्‍या या शौर्ययात्रेला नगर येथे अनन्य साधारण महत्व आहे. या निमित्ताने केडगांव, भिंगार, भिस्तबाग, बोल्हेगांव व ढवणवस्ती परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नगर येथील समाज बांधवांच्यावतीने राजेंद्र पाचे यांनी सांगितले.


 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post