..
अहमदनगर:भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला टपाल कर्मचाऱ्यांनी कुष्ठधाम वृद्धाश्रम मधील बांधवाना मिष्टान्न भोजनाचे आयोजन केले यावेळी श्री एस डी आहेर व बांधव उपस्थित होते. व आज मतिमंद मुलाची निवासी शाळा तपोवन नगर मध्ये विद्यार्थी यांना अल्पोपहार व डॉ आंबेडकर जीवन गाथा या पुस्तकेचे वितरण करण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अहमदनगर प्रधान डाकघर मध्ये मा श्री सौरभजी देशमुख डायरेक्टर इंटर्नल ऑडिट (IA) पोस्टल डायरेक्टर दिल्ली यांचे हस्ते प्रतिमा पूजन धमाचार्य श्री लक्ष्मण महागडे यांचेद्वारे भीमवंदना म्हटली.
यावेळी पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव,कमलेश यादव,संतोष जोशी व श्री सौरभजी देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी श्री संदिप कोकाटे, प्रदिप सूर्यवंशी,बापु तांबे,राधाकिसन मोटे,अजित रायकवाड, श्रीमती निशा उदमले,सुनिल भागवत,रमित रोहिला,तान्हाजी सूर्यवंशी,दिपक नागपुरे, अमोल साबळे, बाबासाहेब शितोळे, सुभाष बर्डे,झुंबरराव विधाते,यांच्या सह मोठया संख्येने टपाल कर्मचारी उपस्थित होते.
---------------------------------------
Post a Comment