पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीसाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर : आ.प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीसाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर : आ.प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
नगर -राज्यसह देशातील धनगर समाजाचे उर्जा केंद्र असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मगांव चौंडी, ता.जामखेड येथील जयंतीसाठी 50 लाख रुपयांच्या निधीस राज्य सरकारने मंजुरी दिली असून,या संदर्भात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज आमदार प्रा.राम शिंदे यांनी 3 एप्रिल रोजी दिलेल्या पत्रानुसार व आमदार गोपीचंद पडळकर यांनी 4 एप्रिल रोजी दिलेल्या पत्रानुसार जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून निधी उपलब्ध करुन देत असल्याचे पत्र नमुद करण्यात आले आहे. 
याबाबतचे आदेश राज्य शासनाचे उपसचिव स.हा.धुरी यांनी काढले असून, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 अंतर्गतच्या इतर जिल्हा योजनेतून एकवेळचे विशेष बाब म्हणून 50 लाख रुपये इतका निधी इतर योजनांच्या बचतीतून उपलब्ध करुन देण्यास शासन मान्यता देत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. 
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती 31 मे 2023 रोजी चौंडी येथे साजरा होणार असून, सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील अहिल्याप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. 
---------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post