पोस्टल फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनिल झुंजारराव तर शिवाजी वासू रेड्डी यांची सेक्रेटरी जनरलपदी निवड

 

अहमदनगर : भारतीय डाक विभागातील मान्यताप्राप्त फेडरेशन FNPO चे बारावे फेडरल काँगेस अधिवेशन रसिकलाल धारिवाल सभागृह आळंदी देवाची पुणे येथे दि 16 व 17 एप्रिल दरम्यान संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे  उदघाटन मा श्री के के शर्मा  चिफ पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र तर श्री रामचंद्र जायभाय पोस्टमास्तर जनरल पुणे रिजन तर संघटनेचे राष्ट्रीय नेते मा श्री निसार मुजावर, श्री शिवाजी वासू रेड्डी,श्री एन के त्यागी,श्री एम के शर्मा, श्री पी यु मुलीधरन,श्री अनिष मिश्रा,डि के यदु यांच्या उपस्थितीत झाले.
पोस्टल विभागातील FNPO या फेडरेशनच्या अंतर्गत असणाऱ्या विविध कॅडर मधील पोस्टल संघटनेचे हे फेडरेशन असून ही सर्वोच्च संस्था आहे. 
श्री निसार मुजावर  यांनी आपल्या  कार्यकाळातील अनेक बाबीचा उदापोह या अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहात पुढे ठेवला.अधिवेशनात महाराष्ट्राच्या वतीने श्री रामभजन गुप्ता,संतोष कदम,संतोष यादव, रत्नाकर अभंग,महादेव गोपालघरे, श्री के एस पारखी,आशुतोष देशपांडे यांनी प्रतिनिधित्व केले.
अहमदनगर विभागाच्या वतीने पोस्टल संघटनेचे जेष्ठ नेते श्री संतोष यादव यांनी प्रतिनिधित्व केले.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुढील तीन वर्षेकरिता राष्ट्रीय कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी श्री सुनिल झुंजारराव (ठाणे)महाराष्ट्र तर सेक्रेटरी जनरलपदी श्री शिवाजी वासू रेड्डी (आंध्र प्रदेश)  श्री उमेश म्हसकर (मुंबई),श्री जगदीश शर्मा (दिल्ली) यांची फायनान्स सेक्रेटरी, तर उपाध्यक्षपदी श्री आशुतोष देशपांडे (,नाशिक) महाराष्ट्र ,श्रीमती सोमा घोष (वेस्ट बंगाल) यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्रतील तीन पदाधिकारी यांनी कार्यकारणीत संधी मिळाली.
या दोन दिवसीय अधिवेशनाकरिता श्री टी एन राहाटे(महाराष्ट्र)श्री डि त्यागराजन(तामिळनाडू)बी शिवकुमार(कर्नाटक),श्री बी एम घोष,श्री रजतदास(,वेस्ट बंगाल) श्री बाबा पठाणकुट्टे,श्री संदिप सैदानी,श्री संजय काळोखे, उत्तमराव जाधव,श्री पी एस शिंदे,श्री  संतोष लाड यांच्यासह देशभरातुन दोनशे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष श्री रामभजन गुप्ता,सूत्रसंचालन श्री विनायक सांगडे, तर आभार प्रदर्शन श्री देवदास देवकर यांनी केले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post