केडगाव: अहमदनगर विभागातील सर्वच पोस्ट ऑफिसमधून दि 9 व 10 फेब्रुवारी 2023 या दोन दिवशी खास मुली करिता असणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेकरिता विशेष मोहिमचे आयोजन करण्यात आलेले असून त्या अनुषंगाने केडगाव पोस्ट ऑफिसमध्ये ही त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.
पोस्टऑफिसची खास मुलीकरिता असणारी ही लोकप्रिय योजना ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवावी या करिता या मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले असून,या योजनेचा प्रसारासाठी केडगाव पोस्ट ऑफिसच्या वतीने विविध अंगणवाडी केंद्रास भेटी देत याची माहिती देण्यात आलेली असून,नुकताच चास या गावी अंगणवाडी सेविका व आरोग्यसेविका याची विशेष मिटिंग घेऊन त्याना या योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
योजनेची माहिती:
●दहा वर्षाखालील मुलीचे पालकांच्या द्वारे खाते
●सुरवातीस फक्त 250 दोनशे पन्नास रु भरून खाते उघडता येते
●शंभरच्या पटीत रक्कम भरता येईल.
●आर्थिक वर्षात किमान एक हजार तर कमाल दिड लाख रु जमा मर्यादा
●पंधरा वर्षे रक्कम भरा.खाते एकवीस वर्षांनी परिपक्व होते.
●गुंतवणूक, व्याज,व परिपक्वता रक्कम आयकर अधिनियम 80 सी अंतर्गत करमुक्त
आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठीची तरतूद असणारी योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जाते.तरी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क करून आपल्या सुकन्याचे खाते उघडावे असे आवाहन श्री संतोष यादव यांनी केले.
--------------------------------- ---------
कोट:
आपल्या कन्येच्या उज्वल भविष्याची आर्थिक बाबीची तरतूद करणारी सुकन्या समृद्धी योजनेत अधिकाधिक मुलीचे खाते उघडावेत म्हणून या विशेष मोहिमेत सहभाग घ्यावा.
संतोष यादव
पोस्टमास्तर
केडगाव
--------------------- --- --- --
Post a Comment