पोस्टाच्या सुकन्या योजनेस विशेष मोहिमेत पालकाद्वारे भरघोस प्रतिसाद
●केडगाव परिसरातील 120 बालिकांचा पालकाद्वारे सुकन्या योजनेत सहभाग
केडगाव: आझादी का अमृत महोत्सव निमित्त डाक विभागाद्वारे संपूर्ण देशभर दि 9 व 10 फेब्रुवारी या दोन दिवशी सुकन्यासमृद्धी योजनेकरिता विशेष मोहीम राबविण्यात आलेली होती. केडगाव पोस्ट ऑफिसद्वारे सुद्धा या दोन दिवशी यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती,या विशेष मोहिमेदरम्यान केडगाव परिसरासह नजीकच्या गावातील पालकांनी सहभाग घेत आपल्या सुकन्याचे या योजनेत खाते उघडले. अहमदनगर विभागातील पोस्टऑफिस मधून या दोन दिवसांत 2519 बालिकेने आपल्या पालकाद्वारे या योजनेत सहभाग घेतला.
या मोहिमेच्या प्रचारार्थ केडगावचे पोस्टमास्तर श्री संतोष यादव यांनी परिसरातील अंगणवाडी केंद्रास भेटी देत या योजनेची माहिती दिली.
मोहिमेच्या दरम्यान पोस्टऑफिसमध्ये विविध रंगाचे फुग्याचे डेकोरेशन रांगोळीचे सुशोभीकरण करण्यात आलेले होते, याप्रसंगी भेट देणाऱ्या बालिकेचे पुष्प देत स्वागत करण्यात येत होते ,मोहिमेच्या पहिल्यादिनी खाते उघडत सहभाग घेणाऱ्या सर्व बालिकांना,पालकांसह उपस्थित राहण्याची विनंती करण्यातआली होती,यावेळी उपस्थित पालकांसह उपस्थित बालिकेच्या हस्ते *सुकन्या* केक कट करण्यात आला व सर्व बालिकेना त्याचवेळी योजनेचे पुस्तक देण्यात आले .या सोहळ्यात पालकासह,बालिकेनेही आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी कु आराध्या राजापुरे,आसिया मोमीन,अनुष्का रणदिवे,आयनूर पठाण,प्रज्ञा घुले,शिया सातपुते, श्रेया गर्जे,श्रेया मसरूफ या बालिकेना सुकन्या समृद्धी योजनाचे पासबुक वितरित करण्यात आले.
मोहीम यशस्वी करणेकरिता श्री संतोष यादव यांचेसह श्रीमती शुभांगी मांडगे,श्रीमती सविता ताकपेरे, श्रीमती कल्पना घोडे,श्रीमती श्वेता बिरुदवडे,श्रीमती वैष्णवी बहिर,श्रीमती ऋतूजा देवकर,श्री सोमनाथ घोडके, अंबादास सुद्रीक,अनिल धनावत,रमेश घुले,शिवाजी कांबळे, श्री बाबासाहेब सोनवणे, श्री बबन शेलार,सूर्यकांत श्रीमंदिलकर,संजीव पवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
-
कोट:
डाकविभागाच्या विशेष मोहिमेस भरघोष प्रतिसादाने आम्ही निश्चितच भारारून गेलो,एवढ्या मोठ्या संख्येने बालिका पोस्टऑफिसशी जोडल्या गेल्या याचा विशेष आनंद आहे,ही योजना अविरतपणे सुरूच आहे तरी जास्तीतजास्त पालकांनी सहभाग घेऊन आपल्या बालिकेचे खाते उघडावे.
संतोष यादव
पोस्टमास्तर
केडगाव
Post a Comment