जत : (प्रतिनिधी) कामगारांच्या हितासाठी असणाऱ्या सर्व शासकीय योजनांचा लाभ सर्व सामान्य कामगार वर्गापर्यंत पोहोचवण्याचे आदर्श कार्य रयत क्रांती कामगार संघटनेमार्फत होत आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली जिल्हा सचिव मा. सौ. रेशमाताई इमडे यांनी व्यक्त केले.
यावेळी रयत क्रांती संघटनेमार्फत बांधकाम कामगारांना पेटी वाटप प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी रयत क्रांती संघटना कामगार आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र सुर्यवंशी, मांगले गणप्रमुख सुभाष पवार, सरपंच सचिन राठोड, पोलिस पाटील पिंटू राठोड उपस्थित होते.
यावेळी जितेंद्र सुर्यवंशी म्हणाले, 'रयत क्रांती संघटनेचे संस्थापक माजी कृषीमंत्री मा. सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. सागरभाऊ खोत यांच्या सहकार्याने आम्ही बांधकाम कामगांराना विविध योजनांचे लाभ मिळवून देत आहोत. सर्वसामान्य व गोरगरीब गरजुंना या योजनेच्या माध्यमातून आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत. मा. सदाभाऊंचा विचार हा तळागाळातील सर्व लोकांपर्यंत तसेच मजुर व कामगारापर्यंत पोहोचविण्याचे काम या कामगार आघाडीच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. .
'केंद्रात व राज्यात सर्वसामान्यांच्या हिताचे सरकार असून कामगार मंत्री मा.ना.सुरेशभाऊ खाडे हे आपल्या जिल्हयाचेच असल्यामुळे कामगारांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाही.
यावेळी राजू खोत, आण्णा बसर्गी, बसवराज बागेळी, रामू बाबर व संख व परिसरातील सर्व कामगार वर्ग प्रचंड संख्येने उपस्थित होता.
Post a Comment