अहिल्यानगर’ नामांतराला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आशीर्वाद तर आ.निलेश लंके विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार

 


अहिल्यानगर’ नामांतराला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आशीर्वाद तर आ.निलेश लंके विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार
नगर -  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अहिल्यानगर नामांतराला पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी जिल्हा नामांतर समितीला आशिर्वाद देताना, ‘तुम्ही हे प्रकरण सरकार दरबारी वरपर्यंत जाऊ द्या मी स्वतः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीशी बोलतो’, असे सांगत नामांतर समन्वय समितीस आशीर्वाद दिले. 
तसेच पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी नामांतर रथयात्रेस ढवळपुरी येथे येऊन पाठिंबा जाहीर केला. याबाबत विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अहिल्यानगर नामांतराचा आवाज उठून; हा  प्रश्न विधान सभेत उपस्थित करण्याचे आश्वासन दिले. 
यावेळी अहिल्यानगर नामांतराच्या जिल्हा समन्वय समितीचे जिल्हा समन्वयक विजय तमनर, कोल्हापूरचे सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक नारायण खलु मोठे देसाई,इंजी. डी आर शेंडगे, दिलीप महाराज चव्हाण, सचिन डफळ, काका शेळके, निशांत दातीर, संतोष गुंजाळ, बाळासाहेब विटनोर, देवेंद्र लंबाते, संजय वडिकते, वैभव तमनर, पोपट बाचकर, अरुण मतकर, सुनिल नजन आदि उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात अहिल्यादेवींचे जन्मगाव तीर्थक्षेत्र चोंडी येथे जाऊन अहिल्यादेवी वाड्यातील महादेव मंदिरात सर्व नामांतर जिल्हा समन्वयक समितीने महादेवची विधीवत पूजा करून हरहर महादेवाच्या गजरात आहिल्यानगर जिल्हा नामांतर शपथ घेतली. आहिल्यादेवीच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अहिल्यानगर नामांतराची मशाल पेटवुन नामांतर लढ्याचे रणसिंग फुंकले. या रथयात्रेचे स्वागत करताना प्रथम कर्जत-जामखेडचे आमदार रोहित दादा पवार, अक्षय शिंदे, कर्जतमध्ये भाजप, वंचित, मनसे आणि नगरपालिकेच्यावतीने पाठींबा देण्यात आला. 
श्रीगोंदा येथे माजी मंत्री चोंडी विकास प्रकल्पाचे प्रणेते माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, वृद्धेश्वर मल्टीस्टेटचे अध्यक्ष विठ्ठल वाडगे, पारनेर नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय औटी, नगरसेवक पै. पठारे, ढवळपुरीचे लोकनियुक्त सरपंच भागाजी गावडे, चेअरमन सुखदेव चितळकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे बंडु रोहकले, सुप्याचे उपसरपंच दत्ता पवार, जि.प. सदस्य राहुल शिंदे, युवा नेते कैलास नर्हे यांनी जोरदार स्वागत केले. 
ही यात्रा रविवार दि.12 रोजी संगमनेर, सोमवार दि.13 रोजी कोपरगांव व राहता तालुक्यातील ही रथयात्रा जनजागृती करणार आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post