अहमदनगर दि.2(प्रतिनिधी जिप्सी प्रतिष्ठानच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत आमदार श्री.संग्राम भैय्या जगताप यांचे हस्ते डॉ. श्री.प्रकाश कांकरिया,डॉ. सौ सुधा कांकरिया,जेष्ठ नाटककार श्री.सदानंद भणगे, अभिनेते श्री.मोहिनीराज गटणे, श्रेणीक शिंगवी अध्यक्ष श्री.शशिकांत नजान,श्री.अनंत रिसे,युवा दिग्दर्शक श्री.स्वप्नील नजान यांच्या प्रमुख उपस्थितीत माऊली सभागृह येथे नटराज पूजन करून करण्यात आले.
या वेळी बोलताना आमदार श्री.संग्राम जगताप म्हणाले की समाजात घडणाऱ्या घटनांची नोंद रंगभूमी घेत असते,चांगल्या प्रथा रुजविणे,वाईट घटनांविरोधात आवाज उठविणे,सामाजिक प्रश्नांवर भाष्य करून जनजागृती करण्याचे काम रंगभूमी करते.अहमदनगर चे कला विश्व अतिशय प्रभावी असून सांस्कृतिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग केले जातात.नवीन वर्षाचे स्वागत प्रत्येकजन आपल्या पद्धतीने करीत असतात पण सातत्याने २५ वर्ष जिप्सी प्रतिष्ठानच्या वतीने नटराज पूजन करून नवीन वर्षाचे स्वागत ही प्रथा आपल्या शहराची ओळख झाली आहे.
जिप्सी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.शशिकांत नजान म्हणाले की १९९७ ला सुरू झालेली जिप्सी प्रतिष्ठानच्या वतीने नटराज पूजन करून नवीन वर्षाचे स्वागत करण्याची प्रथा असून ज्या नाट्य कट्ट्यावर नाटक सुचते, अनेक कलाकृतींचा जन्म ज्या ठिकाणी होतो, नाट्यकर्मींच्या कल्पना मूर्त रूप धारण करतात त्या कट्ट्यावर साधेपणाने कोणताही सत्कार समारंभ न करता होणारे नटराज पूजन नगरच्या नाट्य क्षेत्रातील एक अविभाज्य घटक झाले आहे.
या वेळी बोलताना डॉ.सौ. सुधा कांकरिया म्हणाल्या
की जिप्सी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक कलाकार तंत्रज्ञ तयार झाले,घडले त्यांना नाट्य-चित्रपटात क्षेत्रात मोठी संधी निर्माण झाली. तंत्रशुद्ध कलाकार आणि तंत्रज्ञ घडविणे याच बरोबर नगरच्या सांस्कृतिक क्षेत्रात विविध प्रयोग करणे हे महत्वाचे कार्य या संस्थे मार्फत होत आहे.
नाटका बरोबर नवीन तंत्राचा स्वीकार करत वेबसिरीज क्षेत्रात जिप्सी फिल्म्स नवोदित आणि जेष्ठ कलाकारांना सोबत घेऊन प्रभावी अशी निर्मिती करीत आहे भविष्यात चित्रपट क्षेत्रात नगरला मोठे स्थान निर्माण करण्याचे प्रयत्न ही संस्था करते आहे असे श्रेणिक शिंगवी यांनी संगितले.
जिप्सी प्रतिष्ठान आणि फिल्मस च्या पुढील उपक्रमांची स्वप्नील नजान यांनी माहिती दिली श्री.अनंत रिसे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन शशिकांत नजान यांनी केले. यावेळी डॉ. विजय जोशी,सौ.गौरी जोशी,प्रिया सोनटक्के,श्री.सागर मेहेत्रे, मराठवाडा मित्र मंडळ,मानकन्हैया ट्रस्ट चे सदस्य श्री.सदाशिव मोहिते,उमाकांत जांभळे , दत्ता इंगळे, नंदकुमार देशपांडे, सुभाष बागूल, मनोहर कटके, मोईनुद्दीन इनामदार, पुरूषोत्तम दरबस्सवार, डॉ. सुभाष बागले, रमेशचंद्र छाजेड़, रमेश बाफना, प्रिया सोनटक्के, नंदकुमार देशपांडे,रामदास केदार, गाणपतराव लोखंडे, दिपक शिरसूल
आकाश तोडमल,सचिन क्षीरसागर,प्रीतम गायकवाड,प्रथमेश बर्डे,नाना मोरे,श्री.राहुल भिंगारदीवे, श्री.प्रभंजन कनिंगध्वज, श्री.सचिन जगताप, श्री.भागचंद गारपगारे उपस्थित होते.
Post a Comment