एक अनोळख गेटटुगेदर ....
"भूक छळते तेव्हा .... " या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्ताने निघोज ता.पारनेर अ ' नगर येथे जाण्याचा योग आला .
कारण लेखक संदिप राठोड सर यांची एक-एक कविता जेव्हा आमच्या पारनेर साहित्य साधना मंचावर येत होती. तेव्हा त्या ऊसाप्रमाणे आम्ही पिळवटून निघत होतो .
" वेदनेशी होते भेट
रोज घाम गाळताना
अंगअंग रक्ताळते
गोड ऊस साळताना ... "
अशा ओळी जेव्हा वाचल्या तेव्हा जे ऊसतोड करणारे मजूर आम्ही जाताना-येताना त्यांच्याकडे पाहतो तेव्हा उर भरून येतो. ती गच्च मोळयांची गाडी जात असताना त्यावर बसलेल्या माऊलीच्या ऊराशी असणाऱ्या मुलावर एक आणि दुसरा हात दुसऱ्या मुलाच्या अंगावर तो फक्त आत्मविश्वासाने आपल्या बैलजोडीवर आणि सारथ्य करण्याऱ्या धन्याच्या हिमतीवर ....
खरं तर कवि संदिप यांनी वास्तवात आणून ठेवल होत .
मग काय भूक छळते तेव्हा ... कोयता , भाकर ... अशा कवितेतून येणाऱ्या सत्य जीवन उपभोगण्याऱ्या संदिपचं जीवनपट आम्हीही कवितेतून अनुभवत होतो . आणि हा फक्त कवीच्या आई वडिलांचा संघर्ष नाही तर संपूर्ण ऊसतोडी करणाऱ्या , शेती मातीत राबणाऱ्या अवघ्या समाजाचा संघर्षमय आवाज पोहचवायचे काम कवी संदिप राठोड करत आहे...
उसतोड मजूराचा मुलगा दुष्काळीत बीड जिल्हातील पौळाचीवाडी (मोठा तांडा ) जन्मलेले कवी संदिप लहान असताना अन्न , वस्त्र निवारा आजार शिक्षण सोडून बाकी प्राथमिक गरजासाठी घेतलेले सावकाराकडून कर्ज फेडण्याकरता घेतलेली उचल त्यांचे आईवडिल कारखान्यात ऊसतोडीला जायचे सहा महिने कारखानाने चालू असेपर्यंत ऊसतोड... बाकी सहा महिने गावाकडे कोरडवाहू शेती करून पोटाचे खळगे भरणे एवढच जीवन त्यांना ठाव ....
अशीच भटकंती करत निघोज (ता. पारनेर ) येथे देवदूतरूपी गोविंद मार्तंड लंके व गीताभाऊ भुकन यांनी आसरा दिला . आईवडिल कामाला गेल्यावर झोपडीबाहेर खेळण्याऱ्या सर्व भावंडांना बाबासाहेब वराळ गुरुजींनी शाळेची वाट दाखवली पुढे या वाटेतून ही भावंड मार्ग काढत शिक्षण घेत असता मुलिकादेवी विद्यालय १० वी पर्यंत शिक्षण घेत असताना . बाहेरील गावावरून आलेल्या निघोज विद्यालयात शांत संयमी संदिपकडे अगदी बोटावर मोजणारे मित्र ....
परंतू पुढे २० वर्षानंतर सर्व दहावी बॅच संपर्कात आली ती फक्त हाय बाय .. एवढेच करण्यासाठी नाही तर प्रत्येकास सुखदुःखात अडचणीत मदत करणारी एक आगळी वेगळी बॅच ....
जी फक्त get together मजा करण्यासाठी नव्हे तर ग्रुपवर येणाऱ्या प्रत्येक कवितेची जाणीव व भावनांचा आदर करणारी बॅच ...
कारण प्रत्येक संदिपच्या जीवनातील क्षण या मित्र मैत्रिणींनी जवळून पाहिल्याचे साक्षीदार असणारी बॅच ...
शिक्षण घेताना कवि संदिप यांना अडचणी पाहूनही मदत करता आली नाही पण आज स्वबळावर स्वाभिमानाने एकत्र येऊन आपल्या मित्राचा त्यांनी कवितासंग्रह प्रकाशित करण्याचे ठरवले .
त्याकरता सर्व मित्रमैत्रिणींनी एकमेकांशी चर्च करून , चर्चेतून आर्थिक समस्यांचे अडसर दूर करून सर्वांनी मिळून पुस्तक छपाईसाठी निधी गोळा करून भूक छळते तेव्हा ... कवितासंग्रह प्रकाशीत केला.
पुस्तक प्रकाशित करणाऱ्या *श्री .मुलिकादेवी विद्यालय २००३* दहावी बॅच
एक आदर्शमय गेटटुगेदर करून आपला बालमित्र संदिप यास मैत्री असावी संकटी धावणरी
संकटाना पळवून लावणारी
कवी संदिप राठोड यांचा कवितासंग्रह "भूक छळते तेव्हा .. "
प्रकाशन सोहळयात हा कवितासंग्रह प्रत्येक मित्रमैत्रिणीचा आहे असा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावरून वाहत होता .
असे हे एक आगळे वेगळे अदाहरण म्हणजे श्री मुलिकादेवी विद्यालय दहावी बॅच २००३ यांचा आदर्श सर्वच whats App group , Get together करणाऱ्यांपुढे आदर्शच .....
धन्य ते मूल्य शिक्षण देणारे श्री मुलिकादेवी (निघोज ) विद्यालयातील शिक्षक .. धन्य ते संस्कार करणारे आई वडिल .
एक आदर्श घडवून आणणरं हे निघोज येथील श्री मुलिकादेवी विदयालयातील सन २००३ इयत्ता दहावी बॅच *गेट टुगेदर*
शब्दांकन
✍🏻योगिता भिटे /टिक्कल
Post a Comment