नागपूर मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार

भाजप भटके-विमुक्त आघाडीची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

नागपूर मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार-अशोक चोरमले

     नगर - भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीचा 22 डिसेंबर 2022 रोजी नागपुर येथे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावन्नकुळे, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आ.नरेंद्र पवार, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ओबीसी मंत्रालयाचे ना.अतुल सावे, यांच्या उपस्थितीत होत आहे. या राज्यव्यापी मेळाव्यास नगर जिल्ह्यातून सक्रिय सहभागी होणार असल्याची माहिती, भाजप प्रदेश भटके विमुक्त आघाडीचे संघटन सरचिटणीस अशोक चोरमले यांनी दिली. येथील शासकिय विश्रामृहात भाजप भटके विमुक्त आघाडीची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. यावेळी प्रदेश संघटन सरचिटणीस अशोक चोरमले बोलत होते. दक्षिण जिल्हाध्यक्ष राहुल कारखेले, शहर जिल्हाध्यक्ष निशांत दातीर, महिला जिल्हाध्यक्षा राणी वारे, भिंगार मंडल अध्यक्ष अमोल गावडे, केडगांव मंडल अध्यक्ष मंगेश भिंगारे, मध्य शहर मंडल अध्यक्ष राजेंद्र वाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तागड, सुभाष फुलमाळी, संघटन सरचिटणीस गोविंद तांदळे, आदेश राहिंज, कविता वारेे, रामदास भताने, मयुर तागड, नितीन गंगेकर  ,राजेंद्र जाधव, स्वानंद पिंपुटकर आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.   पुढे बोलतांना चोरमले म्हणाले की, महाराष्ट्र भटके-विमुत जातीच्या 52 पोटजाती आहे. वसंतराव नाईक महामंडळासह स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली, असून या माध्यमातून सर्व समाज घटकांना न्याय देण्यात येणार आहे. तांडावस्ती सुधार योजना व नव्याने समाज कल्याण विभागामार्फत अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. यासर्व योजनांची माहिती शेवटच्या घटकांपर्यंत पोहवावी, असे आवाहन त्यांनी केले.  तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना काळात केलेले विश्वविक्रमी लसीकरण, मोफत धान्य वाटपासह इतर सुविधांसंदर्भात ‘धन्यवाद मोदी अभियान’ राबवून संघटनात्मक बांधणी करावी. भटके जातीच्या 52 पोट जातीतील प्रत्येक समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे, याची काळजी घ्यावी, असे आवाहन चोरमले यांनी केले.  प्रारंभी दक्षिण जिल्हाध्यक्ष राहुल कारखेले यांनी दि.22 रोजी नागपुर येथे होणार्‍या मेळाव्यासाठी तालुक्यानिहाय बैठका घेऊन नियोजन करण्यात येईल असे सांगून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भटक्या समाजाला न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख तांदळे यांनी केले तर आभार निशांत दातीर यांनी मानले.


 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post