श्रीमंत राजे यशवंतराव होळकर जयंती उत्सवानिमित्त दि.10 रोजी धनगर मेळावा

 


धनगर समाजाच्या मेळाव्यातूतन ‘आरक्षण’लढा तीव्र करणार

- विजय तमनर

     नगर - यशवंत सेनाच्यावतीने दि.10डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वा. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, टिळकरोड, अहमदनगर येथे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर जयंती उत्सवाच्या निमित्ताने धनगर मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे, धनगर ऐक्य परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.शशिकांत तरंगे, आमदार संग्रामभैय्या जगताप, शेळी-मेंढी विकास महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक डॉ.शशांक कांबळे, समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त सौ.संगीता डावखर, समाज कल्याण नगर उपायुक्त राधाकिसन देवढे, डॉ.राहुल पंडित, डॉ.स्वप्नील माने, समाजभुषण प्रकाश भांबरे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांनी दिली.

     या पत्रकार परिषदेसाठी यशवंत सेनेचे शहरप्रमुख कांतीलाल जाडकर, राज्य कार्य.सदस्य किरण खरात, राजेंद्र तागड, बापूसाहेब बाचकर, निशांत दातीर, दक्षिण जिल्हाप्रमुख अशोक वीरकर, उत्तर प्रमुख किरण थोरात, आहिल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ताभाऊ खेडेकर, संजय वडितके (श्रीरामपूर), कैलास नर्‍हे (पारनेर), भागवत झडे (राहुरी), अदिनाथ भानगुडे (पाथर्डी ), शहराध्यक्ष अप्पा सरोदे, युवा आघाडीप्रमुख अतुल वडितके, संपर्कप्रमुख रंगनाथ तमनर, दत्तात्रय गळंगे, अ‍ॅड. रवी हळनोर,  अमोल खेमनर (संगमनेर), सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ तमनर, अनिलजी डोलनर आदि समाज बांधव उपस्थित होते.

     माहिती देतांना  विजय तमनर म्हणाले, गेल्या 65 ते 70 वर्षांपासून धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे. धनगर समाजाला सर्वच राजकीय पक्षांनी फसविले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून शेळी विकास महामंडळाच्या योजना व समाज कल्याण विभागाच्या योजना समजावून सांगण्यात येणार आहे. या मेळाव्यात काही प्रमुख मागण्या मांडल्या जाणार आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणा संदर्भातील ज्या न्यायालयीन याचिका प्रलंबित आहेत, त्या सरकारने फास्टट्रॅक कोर्टात चालविल्या जाव्यात. मेंढपाळांना चराई कुरण राखीव करावे,  मेंढपाळांना स्व:संरक्षणासाठी शस्त्र परवाना द्यावा,  धनगर समाजाला एस.टी. आरक्षण मिळावे, धनगर समाजातील मुला-मुलींना जिल्हास्तरीय शासकीय वसतीगृह तात्काळ सुरु करावे, शेळी-मेंढी विकास महामंडळाला निधी उपलब्ध करुन द्यावा, आदि मागण्या या मेळाव्याच्या माध्यमातून सरकारकडे केल्या जाणार आहे.

     चौकट

     श्रीमंत राजे यशवंत होळकर यांची जयंती साजरी करुन धनगर आरक्षणावर फसविलेल्या सर्व राजकीय पक्षांची पोलखोल प्रत्येक तालुक्यात, गावात, वाड्या वस्त्यांवर जाऊन करणार - विजय तमनर

-------

     

 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post