भारतीय सामाज व्यवस्थेमध्ये आहिरे आणि नाहीरे वर्ग आहेत. ज्याच्यांकडं सत्ता, संपत्ती, अधिकार आणि सवलती असतात त्यांना आहिरे असे संबोधलं जातं.तर ज्याच्यांकडं वरील बाबी नाहीत ते नाहिरे वर्गात मोडतात. ज्याला आपण श्रीमंत आणि गरीब असं म्हणतो.मध्ययुगीन भारतामध्ये नाहीरे वर्गातुन आहिरे वर्गात प्रवेश करण्यासाठी मार्ग प्रशस्त झाला. परंतु तो प्रवेश सहज झाला नाही, त्यात प्रचंड संघर्ष होता. त्यासाठी विश्वास संपादन करावा लागे. स्वकर्तृत्व सिध्द करावं लागत असे. मध्ययुगीन भारतामध्ये धनगर समाजामध्ये स्वकर्तृत्वानं, पराक्रमानं जबरदस्त महत्वाकंक्षा असल्यानं श्रीमंत मल्हारराव होळकर नावाचा राज्यकर्ता होऊन गेला. त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सारखे रत्न हेरलं आणि राज्यकारभारासाठी संधी दिली. हाच उज्वल वारसा अहमदनगर जिल्हयाचे माजी पालकमंत्री आणि महाराष्टाचे माजी जलसंवर्धन व राज्चार मंत्री नामदार प्रा. राम शिंदे साहेब यांच्याकडं आलेला दिसून येतो. ते अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरकडील थेट वशंज आहेत. श्रीमंत मल्हारराव होळकर ते रामराव या हा प्रवास लक्षात घेतांना दोघांच्या व्यक्तीसामथ्र्यांचं शक्तीस्थळे म्हणजे मुत्सदीबाणा आणि धुर्तपणा हे आहेत. दोघांनीही सत्तासंघार्षामध्ये शुन्यतुन वि निर्माण करणारे आहेत. श्रीमंत मल्हारराव होळकर एक मेंढपाळ ते इंदौर संस्थानचे अधिपती झाले. तर प्रा. राम शिंदे यांचा स्थानिक स्वराज्य संस्था ते राज्याचे कॅबिनेट मंत्री असा प्रवास झाला. दोघांच्या हा विलक्षण प्रवास थक्क करणारा आहे. आपल्यातला सामान्य माणूस राज्यकर्ता होतेा. प्रा. राम शिंदे मंत्री झाले. त्यावेळी समाजातील सर्व सामान्य माणसाला किती मोठा आंनद झाला होता. प्रा. राम शिंदे हे स्वच्छ प्रतिमा, उत्कृष्ठ वक्र्तृत्व, चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व आहे. प्रत्येक धनगर समाजातील माणसाला आपणच मंत्री झालो आहे असे वाटायाला लागले. प्रा. राम शिंदे यांच्या राजकारणातील गरूड भरारी आपणा सर्वांना प्रेरणादायी वाटते. 1 जानेवारी साहेबांचा वाढदिवस म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी हा लेखन प्रपंच!.
महाराष्टाच्या मातीत जन्म घेतलेले हे दोन नररत्न. ते ही या राज्यातील मुळ निवासी असलेल्या धनगर जातीत. महाराष्टाला महाराष्ट हे नामाधिन का मिळाले? त्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी हटजनांचा प्रदेश म्हणजे महाराष्ट असा राज्याच्या नावाच्या व्यत्पत्तीचा एक सिध्दांत इतिहासकार मानतात. हटजन म्हणजे झाडीप्रदेषात राहणारे लोक म्हणजेच धनगर. धनगर हे राज्याचे मुळ निवासी ठरतात, ते आदिवासी आहेत. पशुप्राण्यांची जान म्हणजे ज्ञान. आणि माणुसकीची आण असणा-या लढाऊ बाण्याच्या धनगर जाीतीतील अषा कुलात श्रीमंत मल्हारराव होळकर आणि प्रा. राम शिंदे यांचा जन्म होतो. श्रीमंत मल्हारराव होळकर पेशव्यांचे तोलदार सरदार होते. त्यांनी रणागंणावर मर्दुमकी गाजविली. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान पहिले बाजीराव पशेव्यांचा विष्वास संपादन केला. त्यांना दिलेली कामगिरी अंत्यत निष्ठेने व जबाबदारीने पार पाडली. त्यामुळे श्रीमंत बाजीरावांचा अत्यंत विष्वासू मित्र म्हणून गौरव झाला. खरं तर खंडोजी होळकर हे पुणे जिल्हयातील होळ या छोटयाषा खेडयातील चैघुला होते. चैघूला हे त्यावेळच्या ग्रामरचनेतील छोटसे पद किंवा हुद्दा होता.खंडोजींचे मल्हाररावांच्या बालपणीच निधन झाले. म्हणजे मल्हाररावांच्या वडीलांचे निधन झाल्याने ते पदही गेले. भावबंदकी सुरू झाली. त्यास कंटाळून मत्हाररावांच्या आईने भावाचे घर गाठले. म्हणजेच ते तळोदा येथे बारगळांकडे रहावायास आले. बारगळ हे सरदार कदमबांडे यांच्या पदरी सैन्यात होते. येथेच मल्हाररावांच्या नशिबी राजयोग आलेला दिसून येतो. येथे बालपणी ते मेंढया संभाळत असे. येथूनच त्यांचा सैन्यातील षिपाई हा प्रवास सुरू झाला. सत्ताकारणात पहिले पेषवे बाळाजी विशवनाथ भट यांच्या निधना नंतर छत्रपती शाहु महाराजांनी बाजीरावांना पेशवेपदाचे वस्त्र दिले. त्यावेळी पंत, प्रतिनिधी यांना जोरदार शह देण्यासाठी बाजीरावांने बहुजन सामाजातील राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, पवार, गायकवाड या सारख्या नव्या दमाच्या तरूण सरदारांची फळी निर्माण केली. आणि स्वतः यश्यस्वी राज्यकारभार केला. पुढे ते सर्वजण पशेव्याचे अंत्यत विशवासू सहकारी बनले. श्रीमंत मल्हारराव होळकर संरजामी सरदार झाले, इंदौर संस्थानचे अधिपती झाले. श्रीमंत मल्हारराव होळकर श्रीमंत बाजीराव पेशव्यांबरोबर शेवट पर्यंत होते. श्रीमंत मल्हारराव होळकर आणि प्रा. राम शिंदे या दोघांच्या कार्यकर्तृत्वात प्रचंड साम्य आढळते. मा. ना. अण्णासाहेब डांगे यांनी प्रा. राम शिंदे यांना राजकारणात आणले. मल्हाररावांचा हाच वारसा ना. प्रा. राम शिंदे यांनी चालविलेला दिसतो. शिंदे साहेबांनी राजकारणात प्रवेश केल्यांनंतर कार्यकत्यांची तरूण फळी निर्माण केली. त्यांना सुखदुःखात विष्वास दिला. त्यांना वा-यावर सोडले नाही. प्रचंड संघर्ष केला. स्थानिक स्वराज्य संस्थेत यषापयष आले. तरी सुध्दा संयम ढळू दिला नाही. राजकीय वाटचाल अंत्यत धिराने आणि सौज्यनषिल मार्गाने अविरत चालू ठेवलेली दिसते. अपयषाने खचून न जाता. ते अपयश खिलाडूवृतीने स्वीकारले. तर यशाने हूरळून जाता पाय जमिनीवर ठेवले. आणि नियोजनपुर्वक योजना आखल्या. जनहिताची कामे केली.कल्याणकारी राज्याचा अहिल्यादेवी होळकरांचा वारसा समर्थपणे पेलला. धुर्तपणा हा गुण दोघांच्या व्यक्तित्वात आढळून येतो. सन 1693 ते 1766 या काळात मल्हाररावांनी 75 लढाया जिंकलेल्या आहेत. प्रत्येक मोहिमेच्या वेळी अंत्यत नेटके नियोजन केले होते.षिवाय जी चाल करावयाची ती शत्रूला त्यांचा थांगपत्ता लागणार नाही, असे डावपेच आखले जात. त्यामुळं त्यांच्या युक्तीला राजकीय लोक उंटाची तिरकी चाल संबोधत असे. मल्हारराव ते रामराव या निमित्तानं मल्हारराव होळकर यांच्या चरित्रातील चांगला संदेश आजच्या तरूण पिढीने घेतला पाहिजे असे वाटते. ते एक उदाहरण आजच्या निमित्तानं आठवतात. मल्हाररावांची पहिल्या बाजीरावांशी घनिष्ठ मैत्री होती. राजकारणापलीकडील ती मैत्री होती. श्रीमंत बाजीराव पेषवे देखील मल्हारराव होळकर राणोजी शिंदे यांच्या मांडीला मांडी लावून आपल्या मिंत्राच्या घरी जेवत असे. ती मैत्री दोन्ही बाजुने तितकीच घनिष्ठ असल्याचे उदाहरणे इतिहासाच्या पानापानात आढळतात. तर सन 1740 मध्ये श्रीमंत बाजीराव पेषव्याचे ऐन उमेदीच्या काळात मध्यप्रदेशातील रावेरखेडी निधन होते. त्यावेळी मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे आपल्या जिवलग मित्राजवळ अंतकाळी होते. श्रीमंत मल्हाररावांवर याघटनेचा मोठा परिणाम झाला. आपल्या जिवलग मित्राच्या अचानक निघून जाण्याने प्रचंड दुःख झाले. त्यावेळी मल्हारराव होळकरांनी एक भिष्म प्रतिज्ञा केली. यापुढे मी दारूच्या थेंबालाही स्पर्ष करणार नाही. कारण ते मैत्रीची आठवण म्हणून असा निर्णय घेतात. मल्हाररावांचे सन 1766मध्ये निधन होते. पुढील जीवनपट तपासला असता सन 1740 ते 1766 या काळात मैत्रीपोटी ते कोणतेही व्यसन करत नाहीत. मैत्रीपोटी ते व्यवसनाचा त्याग करतात या घटनेला विषेष महत्व आहे. खरं तर त्याकाळी व्यसनाला प्रतिष्ठा होती. हा बोध मल्हारराव ते रामराव या निमित्तानंआपण सर्वांनी घेतला पहिजे. धनगर समाजाने आपल्या मुलामुलींना भेदाभेद न करता उच्च शिक्षण दिले पाहिजे. समाजात असणा-या वाईट चालिरिती, पंरपरा, अंधश्रध्दा यांची आहारी जाऊ नये. कदाचित हाच शुभसंदेष आपल्या समाज बांधवाना सांगण्यासाठी. ना. प्रा. राम शिंदे जन्म दिवस वर्षाच्या पहिल्याच दिवशी येत असावा. म्हणून हा संकल्प आपण वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या नेत्याच्या सन्मानार्थ करावयास काय हरकत आहे.
राम शिंदे यांचा जन्म 1 जानेवारी 1969 रोजी एक सामान्य धनगर कुटुंबात झाला. ते उच्च शिक्षण घेतल्यावर प्राध्यापक झाले. आदरणीय अण्णासाहेब डांगे यांना पुण्यलोक अहिल्यादेवी होळकरांचा प्रचंड अभिमान आहे. अहिल्यादेवीचे जन्मगाव जामखेड तालूक्यातील चैंढी हे होय. डांगे साहेब अहिल्यादेवींच्या जन्मगावी दर वर्षी कार्यक्रमास येत. ते राजकारणातील अंत्यत अभ्यासू आणि कर्तृत्वान प्रस्थ होते. ते त्यावेळी ते भारतीय जनता पक्षाचे प्रतिष्ठीत पुढारी होते. त्यांनीच चैंढीतील प्रा. राम शिंदे यांना राजकारणात आणले. अहिल्यादेवीच्या माहेरातील या तरूणांला आपण राज्यकर्तेआहोत. राज्यकर्ता झाले पाहिजे. असा उपदेष दिला. मग मात्र राम शिंदे साहेबांनी मागे वळून पाहिले नही अनेक संकटे, यशापश आले.
मुळातच प्राध्यापकी पेशा असल्याने अभ्यासपूर्ण, सुसूत्रपणे विचार मांडणी राम शिंदे करत असे. आपले मत मुद्येसुदपणे दुस-यास पटवित असे. त्यातुन सभा गाजविणारे फर्डे वक्ते असा नावलौक त्यांचा होत गेला. अंत्यत धडाडीचे नेतृत्व म्हणून आपणांस ते परिचित आहेत. तसेच स्थानिक राजकारणापासून ग्रामिणा लोकांषी सतत नााळ जोडलेला हा नेता. लोकांच्या प्रष्नांची जाण ठेवूनच राजकीय वाटचाल त्यांनी केली. लोकांच्या वेदनांच्यामुळाशी जाऊन उपाययोजान केली. त्या वेदना ते आक्रमणपणे मांडत गेले. सर्वसामान्य माणसांच्या न्यायहक्कासाठी भांडणारा नेता ही ओळख झाली. फार मोठा सत्ता संघर्ष त्यांनी केलेला आढळून येईल. तरी सुध्दा आपल्याला त्यांचा शांत, सयंमी आणि निर्गवी व्यक्तित्व भावते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा या अभिष्टचिंतनी सोहळयांच्या निमित्तांन आढावा घेतांना, त्यांच्या ठायी असणा-या गुणांकडे आपले विशेष लक्ष्य जाते. प्रा. राम शिंदे यांना सामाजिक आणि ग्रामिण जनतेच्या समस्येची चांगली जाण असल्याचे दिसून येते. त्यासाठी ते ठामपणे भूमिका वेळोवेळी घेतात. त्यांची ओळख सत्यनिष्ठ आणि तत्वनिष्ठ राजकारणी म्हणून आहे. म्हणूनच काय त्यांना जामखेड कर्जत विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी भाजपाने दिली होती. त्यात ते विजय झाले होते. त्यावेळी त्यांचे विरोधक ही आमदारकी आपघाताने मिळाली असल्याचा कांगावा करत. अपघाताने झालेला आमदार अशी बोचरी टिका विरोधकांनी केली. तरी सुध्दा आ.प्रा. राम शिंदे साहेब त्याकडे लक्ष्य न देता लोकहित जपण्याचा आपला वंश परंपरेने आलेला वारसा न सोडता काम करत राहिले. पुढे ऑक्टोबर 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत पुन्हा विजय संपादन केला. त्यावेळी विरोधकांचे चेहरे पाहाण्या सारखे झालेले होते. त्यानंतर सन 2019ला झालेल्या विघानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत अपयशआले. ते पचवून लोकसेवेचा वारसा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ते कार्य करत राहिले. त्यांच्या या स्वभाववैशिष्टयाचा फायदा सार्वजनिक व राजकीय जीवनात झालेला आपण जाणताच. सन 2014च्या निवडणुकीत मिळालेला जनधार प्रात्र शिंदे लौकीक अर्थाने चांगला गेलेला आढळतो.त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक विवशासू आणि जनाधर असणा-या या नेत्याला राज्यमंत्री म्हणून राज्यमंत्रीमंडळात स्थान दिले. त्यावेळी त्यांच्यावर गृहराज्यमंत्री यापदा बरोबरच इतर 7 खात्याचा कारभार सोपविला होता. तसेच अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिलेली होती. त्यांच्या कार्याचा आवाका लक्षात घेवून 8 जुलै 2016 पासून मुख्यमंत्री साहेबांनी ना. प्रा. राम शिंदे साहेंबांना कॅबीनेटपदी बढती दिली. म्हणजे राज्याच्या विधीमंडळात निर्णय प्रक्रीयेत सामिल केले. त्यांनी राज्याचे जलसंधारण आणि राज्यषिष्टाचार मंत्री म्हणनू काम पाहिलेले आहे. राजकीय जीवनात अनेक चढ-उतार पाहिलेला हा मुत्सद्दी राजकीय माणूस जमीनीवर घट पाय रोवून येणा-या परिस्थितीशी लढत आहे हे विशेष!. सत्ता असो नसो. सामान्य माणसात राहून सर्वसामान्यांषी त्यांच्या पातळीवर विचार करणारा हा लोकनेता प्रचंड उर्जा असणारा अफालातून नेता सर्वांना हवा हवासा वाटणारा वाटतो. हे जिल्हयातुन भ्रमंती करताना ब-याचदा जाणवते हे माञ हे खरं!. राजकीय जीवनात यश-अपयश पचवून खिलाडू वृतीने आकाश पेलण्याचे सामथ्र्य प्रात्र राम शिंदे ठायी असलेलं पहातांना कार्यकत्र्याना मोठं बळ मिळतंय. सर्व प्रवास खुपच पे्ररणादायी आहे. म्हणून राज्यातील समाज बांधव आपल्यातला माणूस राज्यकर्ता होतो, याचे कौतुक आणि स्वाभिमान बाळगतो. आज ना. प्रा. राम शिंदे साहेब हे स्वच्छ प्रतिमा, उत्कृष्ठ वक्तृत्व, चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व म्हणून माहिती आहे. तसेच धनगर समाजाचे नेते म्हणन सर्वदूर परिचित आहेत. महाराष्टाची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीकडे आणि मल्हारी मार्तंडांच्या चरणी आम्ही त्यांना उत्तम दिर्घायुष्य लाभे अषी प्रार्थना करतो. त्यांच्यकडून समाज आणि राष्टाची मोठी सेवा घडो, अशी प्रार्थना राज्यातील समाज बांधव आज त्यांच्या जन्मदिनी करत आहे
Post a Comment