डाक विभागातील उल्लेखनिय काम करणाऱ्या गुणवंत कर्मचाऱ्यांचा पुणे येथे विशेष गौरव

●अहमदनगर विभागातील पाच जणांचा सामावेश
●राष्ट्रीय डाक सप्ताहाचे निमित्ताने विशेष उपक्रम

अहमदनगर: जागतीक टपाल दिनाच्या निमित्ताने दि 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय डाक सप्ताह हा विविध कार्यक्रमाने साजरा केला जातो. दि 13 ऑक्टोबर हा  अंत्योदय म्हणून साजरा केला जातो, डाकसप्ताहाच्या सांगता दिनी डाकविभागातील विविध सेवेमध्ये  दि 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत उल्लेखनिय काम करणारे ग्रामीणडाकसेवक,पोस्टमन, डाक सहायक ,सबपोसरमास्तर, अधिकारी यांचा विशेष गौरव,व मध्यावधी पुरस्कार वितरण सोहळा कमिन्स सभागृह श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक पुणे येथे मा श्री रामचंद्र जायभाये पोस्टमास्तर जनरल पुणे तर श्रीमती सिमरन कौर निदेशक पुणे यांच्या हस्ते सर्व गुणवंत कर्मचारी अधिकाऱ्याचा विशेष गौरव करण्यात आला.
पुणे क्षेत्रातील अहमदनगर सोलापूर सातारा व पुणे या चार जिल्ह्यातील श्रीरामपुर, अहमदनगर,पंढरपूर, सोलापूर,सातारा,कराड,पुणे ग्रामीण,बारामती,पुणे ईस्ट,पुणे वेस्ट या  अकरा विभागातील डाक सेवेमधील  सिईएलसी, इंडियन पोस्ट बँक नवीन अकाउंट, इन्शुरन्स, पोस्टऑफिस सेव्हिंग बँक नवीन अकाउंट ओपनिंग, स्पीडपोस्ट ,सुकन्या करिता असणारी विशेष योजना ग्रामीण भागात तिचा विशेष प्रसार करून सुकन्या ग्राम करण्यासाठी मोलाचे योगदान देणारे, स्वच्छता कॅपेनिग,यासह उपविभागात सर्व सेवेमध्ये उल्लेखनिय योगदान असणारे उपविभागीय अधिकारी तर  विभागात उल्लेखनिय योगदान असणारे अधिक्षक,प्रवर अधिक्षक यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
 यामध्ये अहमदनगर विभागातील आरपीएलआय मध्ये श्री दिपक भुसारी ब्रँच पोस्टमास्तर माळेगाव शेवगाव,पोओएसबी नवीन अकाउंट ओपनिंगमध्ये श्री महेश तामटे ,सबपोस्टमास्तर सावेडी रोड यांना प्रथम तर केडगावचे पोस्टमास्तर श्री संतोष यादव यांना द्वितीय पुरस्कार, उपविभागात सर्व सेवेत उल्लेखनिय काम करणारे,श्री संदिप हदगल सहायक अधिक्षक वेस्ट उपविभाग अहमदनगर यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.तर स्वच्छता कॅपेनिग मध्ये विशेष योगदान देणारे  अहमदनगर प्रधान डाकघरातील श्री आर डी गोसावी एमटीएस यांचा विशेष गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात श्री सिमरन कौर निदेशक व  श्री रामचंद्र जायभाये यांनी विशेष सर्वांचे अभिनंदन करत मार्गदर्शन केले.
यावेळी अकरा विभागातील पुरस्कार प्राप्ती,श्री संदीप हदगल,श्री भूषण देशमुख, श्री सी एफ नदाफ,श्रीमती नेहा कुमारी ,योगेश वीर,सचिन कामथे, हे उपविभागीय अधिकारी तर श्री बाळकृष्ण एरंडे (पुणे ग्रामीण)श्री दिलीप सर्जेराव( बारामती)डॉ अभिजित इचके (पुणे ईस्ट) श्री व्यंकटेश रेड्डी (सातारा) हे विभागीय अधिकारी, सर्व पुरस्कार प्राप्त कर्मचारी, यांचेसह श्रीमती हनी गंजी  अधिक्षक डाकघरअहमदनगर,श्री योगेश वाळुंजकर,क्षेत्रिय कार्यालयातील  अधिकारी कर्मचारी,पुणे शहरातील अधिकारी यांचे सह मोठ्या कर्मचारी संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्तात्रय वराडी सहायक अधिक्षक तर आभार प्रदर्शन श्री पी ई भोसले असिस्टंट पोस्टमास्तर जनरल पुणे यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post