अहमदनगर (प्रतिनीधी)अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने दिनांक १६ आणि १७ ऑक्टोबर २०२२ रोजी येथील माऊली सभागृहात कलारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून स्वागताध्यक्ष आ.संग्राम जगताप आहेत अशी माहिती अध्यक्ष अमोल खोले यांनी दिली
या मोहोत्सवा अंतर्गत दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सुंदर भवन झोपडी कँटीन येथे सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत नाट्य अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
या स्पर्धेसाठी
सांघिक पारितोषिक प्रथम ३०००, द्वितीय २०००,तृतीय १००० ,उत्तेजनार्थ स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र वैयक्तिक वाचन अभिनय गटासाठी प्रथम रुपये १०००,द्वितीय ५००,तृतीय ३०० स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे स्वरूप असून नियम - कथा,वैचारिक लेख,एकांकिका किंवा नाटक हा वाचनाचा प्रयोग सलग नाट्यत्मक अनुभुती देणारा असावा,स्पर्धक कलाकारांची संख्या किमान दोन ते कमाल सहा असावी,कालावधी २० ते ३० मिनिटे असावा,नेपथ्य,प्रकाश योजना,तसेच विशिष्ट रंगभूषा, वेशभूषा याचा वापर करता येणार नाही,संगीर वापरता येईल परंतु त्याचे वेगळे गुण असणार नाहीत सर्वोच्च महत्व अभिनयाला असेल. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क २५० रु असेल,परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख नाना मोरे आणि अभिजित दरेकर आहेत. अधिक माहिती साठी ९८२३२९७५२९ येथे संपर्क साधावा अशी माहिती प्रमुख कार्यवाह सतीश लोटके यांनी दिली.
याच दिवशी दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ८:०० वाजता महाराष्ट्राची महागायिका सौ.सन्मिता धापटे- शिंदे यांच्या थोड्या गप्पा- थोडी गाणी या संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच दिनांक-१७ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ८:०० वाजता प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले,अभिनेत्री कविता लाड यांची प्रमुख भूमिका असलेले एक लग्नाचिपुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग आयोजित केला असून तिकीट विक्री माऊली सभागृह येथे दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होईल यातील काही जागा राखीव आहेत.अशी माहिती उपाध्यक्ष शशिकांत नजान यांनी दिली.
कलारंग महोत्सवास रसिकांनी मोठा प्रतिसाद द्यावा असे आवाहन स्वागताध्यक्ष आ.संग्राम जगताप आणि अध्यक्ष अमोल खोले यांनी केले आहे.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष डॉ. श्याम शिंदे,नियामक मंडळ सदस्य सतीश शिंगटे,कार्यकारिणी सदस्य सुनील राऊत,प्रा.योगेश विलायते,सुशांत घोडके,प्रा.शुभांगी कुंभार,विशाल कडूस्कर,शिवाजी शिवचरण,शेखर वाघ,पुष्कर तांबोळी,गणेश लिमकर प्रयत्नशील आहेत.
Post a Comment