पाऊलबुधे फार्मसी कॉलेजमध्ये `फार्मासिस्ट डेʼउत्साहात

 
 नगर - वसंत टेकडी येथील डॉ. ना.ज. पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात   "जागतिक फार्मासिस्ट डे" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
       याप्रसंगी  सामुहिक फार्मासिस्ट प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बी.एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या  डाॅ. रेखाराणी खुराना  उपस्थित होत्या.  
     जागतिक फार्मासिस्ट दिन २०२२ ची थीम निरोगी जगासाठी फार्मसी एकत्रितपणे कार्ये करीत आहे. या दिनानिमित्त महमहाविद्यालयात  विविध उपक्रम करण्यात आले.यामधे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे आयोजन डाॅ. सुचित्रा डावरे,प्रा.वंदना घोडके  यांनी केले. विद्यार्थ्यांनी रांगोळीद्वारे निरोगी भारत कसा तयार होईल. हे दाखवून दिले. तसेच संस्थेचे पदाधिकारी रघुनाथ कारमपुरे  यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. करोना च्या काळात ऑक्सिजन ला कसे महत्त्व आले होते हे पटवून देत. निसर्गाकडून आपल्याला ऑक्सिजन चे भरभरून वरदान मिळाले तेच आपण जोपासले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. प्राचार्य भरत बिडवे  यांनी रोपांचे संवर्धन कसे करावे.वृक्षाचे आपल्या जीवनात किती महत्व आहे हे सांगितले.
कार्यक्रमास फार्मसी कॉलेजचे प्राचार्य  डॉ. निलेश जाधव  डिप्लोमा कॉलेज चे  प्राचार्या सौ.अनुराधा चव्हाण , माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य भरत बिडवे , रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप कांबळे  डी.एड कॉलेजच्या प्राचार्या सौ.सविता सानप  तसेच प्राध्यापक , फार्मसी वृंद आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष मा.श्री विनय पाऊलबुधे साहेब उपाध्यक्ष श्री.रामभाऊ बुचकूल खजिनदार श्री.रामकिसन देशमुख  सदस्य श्री दादासाहेब भोईटे साई पाऊलबुधे साहेब तसेच पदाधिकाऱ्यांनी सर्व फार्मसीस्टला जागतिक फार्मसीस्ट दिनाच्या शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री.सुधीर गर्जे, सौ.काजल जोंधळे यांनी परिश्रम घेतले.  सुत्रसंचालन प्रणाली अनमल यांनी केले तर आभार प्रदर्शन चिंतामणी ईशान याने केले.                 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post