काही समाजबांधवांनी नरेंद्र दादा पवार म्हणजे जणु भटके समाजाचे हिराच आहे.अजुन पर्यत कोठल्याही नेते आमचे पर्यत आले नाही.पवार आले तसेच त्यांना समाजाच्या विकास करण्यासाठी महामंडळ वर वर्णी लागवे असेच मागणी केली आहे
भाजपा भटक्या विमुक्त आघाडी दुर्लक्षित घटकांच्या भक्कम पाठीशी: माजी आमदार नरेंद्र पवार
संगमनेर शहर : (प्रतिनिधी ) भटक्या मुक्त समाज हा सातत्याने आपल्या पाठीवर बिर्हाड बांधून पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करतो मात्र विनाकारण त्यांना त्रास देवून त्यांच्यावर हल्ले होत असल्याचे दिसत येत असून यापुढे भाजपा भटक्या विमुक्त आघाडी त्याच्या पाठीशी भक्कम असल्याचे प्रतिपादन भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना विविध कार्यक्रम , कार्यकर्त्याच्या भेटी व विविध ठिकाणी भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या जाणून घेण्याकरिता माजी आ नरेंद्र पवार हे आले असताना संगमनेर येथील भाजपा कार्यालयाच्या भेटी प्रसंगी ते बोलत होते . यावेळी भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक अशोक चोरमले , गोविंदा गुंजाळकर , अॅड श्रीराम गुणपुले , शिवाजी आव्हाड , राजू साळुंखे , कोंडाजी कडनर , शिरिष मुळे , सुनिल खैरे , संपत गलांडे , भारत गवळी , राहुल भोईर , किशोर गुप्ता , सिताराम मोईरीकर , कैलास भरीतकर , विनायक कानकाटे दिलीप रावळ , संतोष पठाडे आदि उपस्थित होते . . यावेळी माजी आ नरेंद्र पवार म्हणाले की , ग्रामिण भागात धनगर.वासुदेव नागपंथी.तसेच भटके समाज हा मोठ्या प्रमाणात विखुरला असून पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढपाळ हा त्यांचा प्रामुख्याने व्यवसाय आहे मात्र यांना चारा हा एकाचं जागेवर मिळत नसल्याने त्यांना दूरवर भटकंती करावी लागते मात्र यांचा काही जण गैरफायदा घेतता जाणुन - बुजुन त्रास देवून त्यांच्या वर हल्ला करताना दिसत आहे . असे हल्ले खोर आता लक्ष्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल तुमच्या पाठीशी आता भाजपा भटक्या विमुक्त आघाडी पाठीशी भक्कम उभी असल्याचे शेवटी पवार यांनी सांगितले .
Post a Comment