मोठ्या उत्सवात कर्मचाऱ्याचा सहभाग
अहमदनगर: भारतीय डाक विभाग अहमदनगर आयोजित आज दि 2 ऑक्टोबर रोजी सकाळी भुईकोट किल्ला अहमदनगर या ठिकाणी फिट इंडिया रन 3.0 दौड चे आयोजन करण्यात आले होते.
मा श्रीमती हनी गंजी अधिक्षक डाकघर यांचे मार्गदर्शनाखाली व मा श्री संदिप कोकाटे पोस्टमास्तर अहमदनगर यांच्या नेतृत्वाखाली या विशेष रनचे आयोजन करण्यात आले होते ,या दरम्यान कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वच्छता दिनाचे औचित्य साधत परिसराची स्वच्छता करण्यात आली.
यावेळी श्री संतोष यादव,राजेंद्र राहिंज,बापू तांबे यांनी आजच्या दौडच्या निमित्ताने सहभागी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
आज सुट्टीचा दिवस असताना ही अहमदनगर शहरातील पन्नास पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते यात महिला कर्मचारी यांचा ही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
यावेळी श्री बापु तांबे,श्री तान्हाजी सूर्यवंशी ,देवेन शिंदे,श्री अनिल धनावत, श्रीमती निलिमा कुलकर्णी,श्रीमती तृप्ती जोशी,श्रीमती सविता ताकपेरे,श्रीमती शुभांगी मांडगे,मिलिंदभोंगळे,अभिमनुकुमार श्री सलीम शेख, श्री अंबादास सुद्रीक यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.
Post a Comment