अहमदनगर (प्रतिनिधि)गणेश शिंदे महाराष्ट्रातील एक ख्यातनाम वक्ते म्हणून आपणा सर्वांना परिचित आहेत. मूळचे नगर तालुक्यातील पारगाव भातोडीचे असणारे गणेश शिंदे यांनी राज्य शासनाच्या अनेक अभियानात आजवर आपले महत्त्वाचे योगदान दिले आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव ही आदर्श गावाकडे वाटचाल करत आहे.
यापूर्वी राज्य शासनाच्या राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या संस्थेचे ते मुख्य सल्लागार होते. यशदा या राज्य शासनाच्या प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण संस्थेत त्यांनी विविध विषयांवर प्रशिक्षक म्हणून काम केले. शासनाच्या सहकार व पणन विभागातील अटल महापणन विकास अभियानाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून त्यांनी राज्यभर दौरा केला. सहकार पणन ग्रामविकास व कृषी आदी विषयावर आजवर त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.
कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग व पणन व्यवस्थापन हा त्यांचा आवडीचा विषय आहे.
आज कृषी क्षेत्रात अग्रगण्य समजले जाणाऱ्या महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या सदस्य पदी राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोषियारी यांच्या आदेशानुसार गणेश शिंदे यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. या निवडीबद्दल कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गणेश शिंदे यांचे अभिनंदन केले. गणेश शिंदे यांच्या कृषी व पणन क्षेत्रातील ज्ञानाचा व त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचा निश्चितच विद्यापीठाला फायदा होईल असे मत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
Post a Comment