नगर - विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात डिप लर्निंग बुईथ पायथॉन प्रोग्रामिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे येथील मितू स्किलोलॉजिस्टचे तुषार कुटे, डॉ.सौ.अंजली वैद्य, संस्थेचे डेप्युटी डायरेक्टर सुनिल कल्हापुरे, प्राचार्य उदय नाईक, आयटी विभागप्रमुख डॉ.दिपक विधाते आदि उपस्थित होते.
यावेळी डॉ.सौ.अंजली वैद्य म्हणाल्या, आर्टिफिशियल इंटिलिजन्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समाजासाठी उपयोग कसा करता येईल यावर भर दिला जाणे आवश्यक आहे.तसेच भाषांतर करणारी प्रणाली विकसित करावी. त्याचा लाभ अभाषिक राज्यांमध्ये सर्वसामान्यांना होईल.
दोन दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शक तुषार कुटे यांनी डिप लर्निंग विषयावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रा.सुनिल कल्हापुरे म्हणाले, विखे पाटील महाविद्यालयाच्यावतीने आधुनिक अभ्यासक्रमांचा स्विकार करुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून त्यांना चांगली नोकरी मिळण्यास मदत होते. आजच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत नक्कीच वाढ होईल, असे सांगितले.
या उपक्रमासाठी चिफ एक्झीक्युटीव ऑफिसर खा.डॉ.सुजय विखे पा., डायरेक्टर डॉ.पी.एम.गायकवाड, डेप्यु.डायरेक्टर प्रा.सुनिल कल्हापुरे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा.श्रुती पोफळे, प्राजक्ता डोलारे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.प्राची धावणे यांनी आभार मानले. यावेळी डॉ.किशोर काळे, प्रा.रविंद्र तांबे, विद्यार्थी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
-
Post a Comment