इस्लामपूर (प्रतिनीधी) सर्वोत्तम नियोजनाने दीनदयाळ सूतगिरणीस ११ कोटी रूपयेचा नफा झाला आहे . सर्वांनी अडचणीच्या काळातही मार्ग काढून प्रामाणीकपणे काम केले आहे म्हणून सूतगिरणी महाराष्ट्रात एक यशस्वी संस्था म्हणून नावा रूपाला आली आहे . या सूतगिरणीचा आदर्श राज्यातील इतर संस्थानी घ्यावा असे मत महाराष्ट्राचे माजी मंत्री आ. जयतं पाटील यांनी व्यक्त केले .
ते येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या २७ व्या वार्षीक साधारण सभेत प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना व्यक्त केले . यावेळी बोलताना . आमदार जयंत पाटील पुढे म्हणाले कि , राज्यातील जवळपास सर्व सूतगिरण्या अडचणीत आहेत . काही अत्यंत अडचणीत आहेत . तर काही सूतगिरण्या बँकांच्या ताब्यात आहेत . राज्यात सर्वत्र अशी परिस्थिती असताना दीनदयाळ सूतगिरणीने ११ कोटी रूपये नफा मिळविला हे या संस्थेचे अति उत्तम यश आहे . सूतगिणीच्या कार्याचा आदर्श राज्यातील इतर संस्थांनी घ्यावा .
सूतगिरणीचे संस्थापक , महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा . श्री . आण्णासाहेब डांगे ( आप्पा ) बोलताना म्हणाले कि , अडचणीच्या काळात ११ कोटी रूपये नफा मिळविणारी राज्यातील एकमेव सूतगिरणी आहे . जगात कापसाचा तुटवडा असताना संचालक मंडळाने अत्यंत काटेकोर पध्दतीचे नियोजन करून सर्वच सूतगिरण्या बंद असताना संचालक मंडळाने वापरलेले कौशल्य उपयोगी आले आहे . दीनदयाळ सूतगिरणी ही एकमेव सूतगिरणी आहे . ५० % पेक्षा जास्त सभासद मागासवर्गीय , ५० % पेक्षा जास्त संचालक मागासवर्गीय व चेअरमन हे पद कायमस्वरूपी मागासवर्गीय असणारी एकमेव सूतगिरणी आहे . या अनुशंगाने पाहिले तर दीनदयाळ सूतगिरणी राज्यात नव्हे तर देशात एक नंबरला पोहोचली आहे . अडचणीच्या काळात सूतगिरणी नफ्यात आणल्याबद्दल मा . श्री . आण्णासाहेब डांगे यांनी स्व:ता पुष्पहार , फेटे , शाली , श्रीफळ आणून सूतगिरणीचे चेअरमन श्री . एम . एन . कांबळे , एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे , जनरल मॅनेजर श्री . विनोद देशमुख , फायनान्स मॅनेजर श्री . आर . एस . मिरजे यांचा महाराष्ट्राचे माजी मंत्री मा . आमदार श्री. जयंतरावजी पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला .
प्रारंभी दीनदयाळजी उपाध्याय यांच्या जयंती निमित्त पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस व पद्मभूषण डॉ . कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधुन महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री . आण्णासाहेब डांगे , शिवाजी विद्यापिठाचे अर्थशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ . वसंतराव जुगळे , उद्योजक बाबुराव हूबाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलनाने वार्षिक साधारण सभेस सुरूवात करण्यात आली .
स्वागत व प्रास्तावीक व्हा . चेअरमन श्री . प्रकाश बिरजे यांनी केले . श्रध्दांजलीचा ठराव संचालक बाळासाहेब खैरे यांनी मांडला , वार्षिक साधारण सभेचे नोटीस वाचन संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी केले . यावेळी मागील सभेचा वृत्तांत वाचुन कायम करणे , ३१ मार्च २०२२ अखेर वर्षातील कामकाजाचा अहवाल वाचन , ताळेबंद नफा - तोटा आदी पत्रकांचे वाचन , अंदाज पत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मान्यता देणे , सन २०२१ २०२२ मध्ये मंजूर अंदाजापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजूरी देणे , सन २०२२ २०२३ वर्षा करिता संचालक मंडळाने शिफारस केलेल्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे , संस्थेचे लेखा परिक्षक मे . फडके लिमये ठाणेदार असोसिएटस यांनी सन २०२१- २०२२ चे केलेल्या लेखापरिक्षण अहवालाची नोंद घेवून गिरणीने तयार केलेल्या दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे , लेखा परिक्षक , आयकर , विक्रीकर , अबकारी कर , व कायदा सल्लागारांची नियुक्ती करणेस मंजूरी देणे आदी सर्व ठराव संचालक श्री . बाळासाहेब खैरे , व्हा . चेअरमन श्री . प्रकाश बिरजे , चेअरमन श्री . मारूती कांबळे , डॉ . अशोकराव ऐडगे , श्री . विलास काळेबाग , सौ . मंगल पवार , श्री . माणीक गोतपागर , श्री . अनिल शेटके , श्री . अमोल चौधरी , श्री . रमेश वडे या संचालकांनी मांडले व उपस्थित सर्व सभासदांनी टाळ्याच्या गजरात व कडकडात मंजूर केले .
महाराष्ट्राचे माजी मंत्री , आमदार मा . श्री . जयंतरावजी पाटील यांचा सत्कार सूतगिरणीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांच्या हस्ते करण्यात आला . सूतगिरणीचे संस्थापक मार्गदर्शक मा . श्री . आण्णासाहेब डांगे ( आप्पा ) यांचा सत्कार चेअरमन श्री . मारुती कांबळे यांच्या हस्ते व प्रमुख पाहूणे शिवाजी विद्यापिठाचे अर्थशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख मा . डॉ . वसंतराव जुगळे यांचा सत्कार व्हा . चेअरमन श्री . प्रकाश बिरजे यांच्या हस्ते शाल , फेटा , श्रीफळ व पुष्पहार घालून करण्यात आला .
सन २०२१- २०२२ सालाकरिता पुढील कामगारांची आदर्श कामगार म्हणून निवड करण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांक श्री . मनोज बळवंत जाधव , खाते विव्हिंग , गांव विठ्ठलवाडी , द्वितीय क्रमांक श्री . बबन महादेव राबाडे , खाते मेंन्टनन्स , गांव शेखरवाडी , तृतीय क्रमांक श्री . पद्मचरण प्रधान , खाते- स्पिड फ्रेम , गांव- ओरिसा , उत्तेजनार्थ म्हणून श्री . दिपक सिंग , खाते रिंग फ्रेम , गांव , मध्यप्रदेश , श्री . जितेंद्र रघुनाथ कांबळे , खाते - रिंग फ्रेम , गांव ऐतवडे ब्रु . , श्री . चंद्रकांत भिमराव वाघ , खाते इंजिनिअरिंग गांव , वाघवाडी , व श्री . मनोहर जयसिंग जाधव , खाते विव्हिंग , गांव विठ्ठलवाडी यांची निवड झाली आहे . त्यांचा अनुक्रमे ५००० / - , ३००० / - २००० / - रूपये रोख तसेच उत्तेजनार्थ निवड झालेल्या चार कामगारांना प्रत्येकी रोख १००० / - रूपये व संस्थेचे सन्मान चिन्ह , बुके व श्रीफळ देवून मा . आमदार श्री . जयंतरावजी पाटील , संस्थापक मा . श्री . आण्णासाहेब डांगे , माजी आमदार अँड . रामहरी रूपनवर , माजी आमदार भगवानराव साळूंखे , डॉ . वसंतराव जुगळे , याच्या हस्ते सन्मान करण्यात आला . यावेळी माजी आमदार श्री . भगवानराव साळूंखे व चेअरमन श्री . मारुती कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
सभासदाकरिता यावर्षी सूतगिरणीच्या वतीने टॉवेल हि भेट वस्तु देण्यात आली आहे . सर्व सभासदांची इस्लाममूर बस स्थानकापासुन येणे जाणेची व्यवस्था करण्यात आली होती . उपस्थित सर्व सभासदांनी भोजनाचा आस्वाद घेतला .
वार्षिक साधारण सभेस कोल्हापूरचे उद्योगपती श्री . आर . एम . मोहिते यांचे चिरंजीव उद्योगपती कोल्हापूर भूषण मा . श्री . आण्णासाहेब मोहिते , मा. श्री. विश्वनाथ डांगे (बापू), जिल्हा परिषद सदस्य श्री . संभाजीराव कचरे , बाळासाहेब पाटील, नगरसेवक श्री. शहाजी पाटील , श्री . खंडेराव जाधव , आयुब हवलदार , शंकरराव चव्हाण , माजी नगरसेवक श्री . अशोकराव देसाई , सांगली जिल्हा धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष संजयदादा पाटील , संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा . अँड . संपतराव पाटील , सुभाष सुर्यवंशी , अशोकराव पाटील , सुनिल मलगुंडे , कृष्णा सहकारी साखर कारखाण्याचे संचालक श्री . अविनाश खरात , संदीप विजयभाऊ पाटील , संजय हवलदार , सि . एच . पाटील , प्रकाश कनप , किसन गावडे , पांडूरंग वाघमोडे , यांच्यासह सर्व सभासद अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्र संचालक प्रा . ए . के . पाटील व बजरंग कदम यांनी केले . संयोजन जनरल मॅनेजर श्री . विनोद देशमुख , फायनान्स मॅनेजर श्री . राजेंद्र मिरजे , प्रोडक्षण मॅनेजर श्री . सुर्यकांत देसाई , आनंदराव मिठारी , लेबर ऑफीसर अदित्य यादव , अशोकराव बडदे , उमेश गावडे , एच . आर . पाटील , इंजिनिअरिंग मॅनेजर श्री . एस . आय . मेत्री यांनी केले . शेवटी आभार संचालक संजय देवकुळे यांनी मानले .
Post a Comment