अहमदनगर: नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप सी महाराष्ट्रची तीन दिवसीय राज्यव्यापी परिषद निसर्गरम्य ठिकाणी स्थित असणारे एम टी डी सी रिसोर्ट श्रीक्षेत्र भिमाशंकर येथे संघटनेचे राज्याध्यक्ष श्री आर एच गुप्ता (मुंबई) यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या परिषदेत राज्यभरातून आलेल्या संघटनेच्या प्रतिनिधीने आपल्या विभागातील दैनंदिन कामकाजात सभासदाना येत असलेल्या समस्या ,स्टाफ शॉर्टज,संगणकीकरणातील कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेममुळे दैनदिन कामकाजात सातत्याने येत असलेल्या अडचणीमुळे ग्राहकांची होत असलेली गैरसोय,व या परिस्थितीमुळे ग्राहकाच्या रोषास कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत असून या विषयावर योग्य मार्ग काढण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली, संघटनेने हा विषय योग्य स्तरावर घेऊन सिस्टिम व्यवस्थित चालनेकरिता आवश्यक असणारी कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा करण्यासाठी याविषयी निर्णायक प्रयत्न कारणासाठी पुढाकार घ्यावा ज्यायोगे आपण आपल्या ग्राहकास समक्षपणे सेवा देऊ शकू अशी अपेक्षा अनेक प्रतिनिधीनी व्यक्त केली.
या प्रमूख विषयासहित स्टाफ शॉर्टज,कोविड कालखंडातील मेडिकल बिले, कोविड कालखंडात रजा अशा महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली.
या प्रतिनिधी सत्रातमध्ये प्रत्येक विभागातील विभागीय सचिव यांनी आपला सहभाग म्हणून नोंदविला.
प्रतिनिधी सत्रातील सर्व प्रतिनिधी याचे मत जाणून घेतल्यानंतर संघटना याविषयी ठराव करून प्रशासनकडे सादर करून याविषयी निश्चितच मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन संघटनेचे राज्यसचिव श्री संतोष कदम (ठाणे) यांनी सांगितले.
या अधिवेशनात महिला व युवा प्रतिनिधींचा सहभाग हा लक्षणीय असून या सर्वच प्रतिनिधीने आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून सर्व बाबीचा उद्घापोह केला यावेळी अहमदनगर विभागातील युवा प्रतिनिधी श्री सागर कलगुंडे यांची डाक विभागातील वेटलिफ्टिंग या साठी राष्ट्रीय पातळीवर निवड झाले बदल गौरव करण्यात आला.
या परिषदेत श्री सुनील झुंजारराव राज्यसचिव पोस्टमन वर्ग महाराष्ट्र (ठाणे ),श्री राजेंद्र करपे राज्यसचिव ग्रामीण डाकसेवक महाराष्ट्र (पुणे),जेष्ठ मार्गदर्शक श्री अरविंद साळवे (मुंबई) श्री असलकरसाहेब (पुणे), श्री शांतीनाथ फुटाणे (उस्मानाबाद) यांचे सह राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव (अहमदनगर) श्री आनंद गवळी (कोल्हापूर),श्री धनंजय यमतकर (अकोला) सहायक मंडळ सचिव श्री कालुराम पारखी( पुणे)श्री नंदू झलबा (गोवा),श्री रत्नाकर अभंग (मुंबई),संजय सनातन (औरंगाबाद) श्री धनंजय इंगोले (नवी मुंबई)श्री महादेव गोपाळघरे (मुंबई) श्री सागर आढाव (श्रीरामपुर)गणेश ठाकूर (धुळे)श्री जितेंद्र पाटील (जळगाव) या राज्य कार्यकरणीतील सदस्यासह
श्री राजेंद्र देवरे, श्री आशुतोष देशपांडे, श्रीमती शुभदा घाग,श्रीमती उषा गोळे,श्रीमती विजया शहाणे,संदिप कोकाटे, सागर कलगुंडे,श्री गोरख दहिवाळकर, गोरक्ष कांबळे,चेतन आपेट,अमोल गायकवाड,अरुण पुजारी,महेंद्र शेजळकर, गुट्टे साहेब,सदा नाईक ,संदिप सैदांनी, सुनील गोहर,विशाल भोपळे,राम वराडे, संतोष शिंदे,राजीव राणे,एजाज काझी,लोटे,,श्री शिवाजी तोंडले,महेश पल्लेवाड, श्री धनंजय शेंडगे,चंद्रकांत चांदरे, दिलीप मराठे,श्री अनिल खांडेकर,श्री रमाकांत शेलार, याचेसह राज्यभरातून आलेल्या एकशेसहा प्रतिनिधीने सहभाग घेतला.
ही सभा यशस्वी करणेकरिता श्री रुपेश नगरकर,एकनाथ गोडवे,बाबा पट्नकुटे, योगेश हरद शंकर गवारी,दिपक सैदांनी,चंद्रकांत पाटोळे, यांचे सह ठाणे विभागातील पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल त्याचा विशेष गौरव करण्यात आला.
श्री पारखी यांच्या आभारप्रदर्शनाने सभेची सांगता करण्यात आली.
चौकट
*महिला प्रतिनिधींची लक्षणीय उपस्थिती*
प्रथमच संघटनेच्या राज्यसभेत महिला प्रतिनिधीने आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत श्रीमती शुभदा घाग व विजया शहाणे यांनी आपल्या विभागातील समस्या सभागृहापुढे ठेवल्या.
Post a Comment