डॉ.निलिमा सोनावणे यांना राज्यस्तरीय‘ आदर्श प्राचार्या पुरस्कार’ जाहीर

 

     नगर -  महाराष्ट्र राज्य शासनाच्या परिचर्या शिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ.निलिमा सोनावणे यांना महात्मा गांधी जयंतीनिमित्त देण्यात येणारा ‘आदर्श प्राचार्या’ महराष्ट्र राज्य 2022 पुरस्कार जाहीर झाला. नर्सिंग महाविद्यालय प्राचार्या म्हणून त्यांनी केलेले उत्कृष्ट कार्य तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास, कोविड महामारीत केलेले शैक्षणिक कार्य, आरोग्य सेवा व जनजागृती कार्यक्रम अशा विविध कार्याच्या योगदानाची दाखल घेत एआयएसएफ वैद्यकीय समितीने ‘हा पुरस्कर जाहीर केला अहे.  त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

     हा पुरस्कर 2 ऑक्टोबर 2022 रोजी खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. डॉ.निलिम सोनावणे या उच्च शिक्षित, सक्षम, कर्तव्य दक्ष, प्रामाणिक व विद्यार्थी प्रिय असल्याची ख्याती आहे. त्या संस्थेमध्ये सतत विविध शैक्षणिक व समाजोपयोगी आरोग्य विषयक कार्यक्रम राबवत असतात.

     विविध शैक्षणिक, सामाजिक संशोधन व आरोग्य विषयक कार्याची दखल यापूर्वी सुद्धा त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संशोधनामध्ये मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post