सामाजिक अस्मिता-बांधलिकी जोपासात सुनिल भाऊंनी केलेले कार्य तरुणांना प्रेरणादायी ठरेल - अक्षय कर्डिले


नगर - सामाजिक क्षेत्रात समाजकार्य करतांना ते एक समाजसेवेचे व्रत म्हणून केले पाहिजे.ही भावना ठेवून सामाजिक अस्मिता-बांधिली जोपासत सुनिल त्र्यंबके यांनी आध्यात्मिक, धार्मिक कार्याबरोबरच समाजातील अनाथ, दिव्यांग अशा संस्थांसाठी केलेले कार्य आजच्या तरुणांना प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले.
वसंत टेकडी येथील द्वारकामाई साई-मंदिरात प्रभाग क्र.2चे नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांचा वाढदिवस त्यांच्या वजनाच्या दुप्पट धान्य नऊ सामाजिक संस्थांना गहू, तांदूळ यांचे वाटप करुन साजरा करण्यात आला. यानिमित्त त्यांच्या या अनोख्या-वेगळ्या उपक्रमाबद्दल युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते श्री.त्र्यंबके यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेवक विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, दत्ता ताकपिरे, बबलू सुर्यवंशी, संतोष लांडे, प्रताप गायकवाड, अमित गाढे, वैभव पोकळे, किशोर वाणे, तिरमलेस पासकंटी, रवि गुडा, देवीदास गुडा, हभप एकनाथ महाराज, प्रसाद रिंगणे देवा आदिंसह जगदंब प्रतिष्ठान, स्वराज्य प्रतिष्ठान, सेवार्थ प्रतिष्ठान, नित्यसेवा ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रास्तविकात साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे यांनी मंदिराच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सुनिल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मिक व सामाजिक कार्य यांची महती दूर पर्यंत पोहचली ही एक वेगळी ओळख कामातून झाली, असे सांगून सर्वांचे आभार मानले. 
-----------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post