नगर - बंदिश सांगीतिक कला प्रतिष्ठान आयोजित आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई व पदव्युत्तर संगीत विभाग, पुणे यांच्या तर्फे श्रुतीरंग या शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि नाटयगीतांच्या बहारदार मैफलीचे आयोजन रावसाहेब पटवर्धन सभागृह येथे करण्यात आले होते. पदव्युत्तर विभागाच्या एम. ए. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी श्रेया कुलकर्णी, सानिका फडके, अपूर्वा कुलकर्णी, शिवानी कुलकर्णी, मिताली सातोनकर यांनी ही मैफल सादर केली.
कार्यक्रमाची सुरुवात श्रेया कुलकर्णी यांनी राग - शंकराने केली. त्या नंतर सर्व विद्यार्थ्यांनींनी पं. भोलानाथ भट यांची राग माला सादर केली. त्यानंतर श्रेया कुलकर्णी यांनी उपशास्त्रीय गानप्रकार दादरा रंगी सारी गुलाबी चुनरिया वैशिष्ट्यपूर्ण सादर केला. त्यानंतर आपदा राजपदा भयदा, खरा तो प्रेमा, कशी या त्यजु पदाला, म्हातारा इतुका, श्रीरंगा कमलाकांता, मी पुन्हा वनांतरी, का धरिला परदेस, मम आत्मा गमला, आगा वैकुंठीच्या राया हे नाट्यपद सर्व विद्यार्थ्यांनींनी अत्यंत तयारीने सादर केले. त्यास रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तबल्यावर प्रसाद सुवर्णपाठकी, संवादिनीवर संकेत सुवर्णपाठकी , तालावाद्यावर आनंद कुलकर्णी यांनी साथसंगत केली.
या कार्यक्रमास डॉ. शीतल मोरे आणि डॉ. पौर्णिमा धुमाळे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. निवेदन मिताली सातोनकर यांनी अतिशय माहितीपूर्ण केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव डहाळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सचिव सुमेधा देशपांडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन खजिनदार प्रकाश कुलकर्णी यांनी केले. अविनाश देऊळगावकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला सर्वश्री पवन नाईक, अंगद गायकवाड, चंद्रकांत पंडीत, अविनाश बोपर्डीकर, भूषण भणगे, अशोक गांधी, दीपक शर्मा, विलास बडवे, कुमुदिनी बोपर्डीकर, अविनाश कुलकर्णी, शरद देशपांडे, किशोर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment