.विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयामध्ये बी.एस्सी प्रवेश अर्ज भरण्याची मोफत सेवा

नगर - विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयात 12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी  कृषि प्रवेश प्रक्रिया पुर्णपणे ऑनलाईन आहे. विखे पाटील कृषि महाविद्यालयात कृषि शाखेत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश अर्ज भरणा सेवा सुरु केली असल्याची माहिती उपसंचालक प्रा.सुनिल कल्हापुरे यांनी दिली.
या ऑनलाईन प्रक्रियेअंतर्गत रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट, स्कॅनिंग, अपलोडिंग या सुविधा मोफत मिळणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ.एस.बी.राऊत (मो.8554990236) व डॉ.व्ही.एस.निकम (मो.8380829993) यांच्याशी संपर्क साधावा. ऑनलाईन अपलोडिंगची अंतिम तारीख 25/9/2022 पर्यंत आहे. विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ.एम.बी.धोंडे यांनी केले आहे. 
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ.सुजय विखे पाटील, सचिव डॉ.पी.एम.गायकवाड यांनी 12 वीच्या विद्यार्थ्यांना भावी उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post