दीन दयाल उपाध्याय शिष्यवृत्ती साठी आयोजित पात्रता परिक्षा संपन्न
अहमदनगर: भारतीय डाक विभागामार्फत दीन दयाल उपाध्याय शिष्यवृत्ती (स्पर्श) करिता आवश्यक असणारी पात्रात परीक्षा आज अहमदनगर विभागातील श्री धाकोजी महाराज विद्यालय निमगाव डाकू कर्जत येथे संपन्न झाली.
या पात्रात परीक्षेसाठी इयत्ता सहावी ते नववी मधील विद्यार्थ्यांसाठी ही परिक्षा असून त्यासाठी किमान 200 रुपये शिलकेचे, प्रधान डाक घरात तिकिट संग्रह विषयक खाते (PDA) असणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांमध्ये तिकिट संग्रह या छंदा विषयी जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने सुमारे 920 विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी सहा हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती डाक विभागा मार्फत दिली जाते
उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख, विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रो० प्रसादशेठ ढोकरीकर, विद्यालयाचे प्राचार्य मा श्री कय्युम मोमिन आदिंच्या माध्यमाधून कर्जत डाक उपविभागात ही परिक्षा प्रथमच घेतली गेली.
या शिष्यवृत्ती परिक्षेसाठी अहमदनगर, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, मिरजगाव,बेनवडी, हाळगाव, पिंपरखेड येथील 51 विद्यार्थी सहभागी झाले होते.
या वर्षी अहमदनगर विभागामध्ये कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू हे एकमेव परीक्षा केंद्र होते.
मा श्री संतोषजी जोशी सहायक अधिक्षक मुख्यालय अहमदनगर मा श्री संदिप हदगल सहाय्यक अधिक्षक डाकघर,श्री अमित देशमुख उपविभागीय डाक अधिकारी कर्जत, श्री बाळासाहेब वाळुंजकर पोस्टमास्तर कर्जत, दिपक नागपुरे, देविदास जाधव बापूराव पंडित, सुनिल धस, आनंद कात्रजकर, अशोक बंडकर,धनराज भोसले, गिताराम शिंदे, प्रफुल्ल वाघमारे आदीच्या सहकार्यातून तिकिट संग्रह विषयक कार्यशाळा व शिष्यवृत्ती परिक्षा पार पडली.
.
Post a Comment