मानवतेचे पुजारी - पंतप्रधान नरेंद्र मोदी- राम कुलकर्णी

 मानवतेचे पुजारी - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- राम कुलकर्णी (भाजप प्रवक्ते)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रकट दिनानिमित्त प्रारंभी शुभेच्छा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आपल्या भारतमातेला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवून देत लोकप्रियतेचं शिखर गाठले आहे. आपलं भाग्य म्हणावं लागेल की ‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत’ याप्रमाणे देशाच्या राजकारणात त्यांच्या नेतृत्वाचा उदय मानवतेच्या कल्याणासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी, भ्रष्टाचारी राजवट उलथवुन सुशासन घेवुन येण्यासाठी झाला हे भाग्य नसे थोडके. ‘सबका साथ, सबका विकास’ हे सुत्र डोळ्यासमोर ठेवुन सामान्य माणसाला प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वसामान्याच्या हिताच्या व शाश्वत विकासाच्या दृष्टिने अनेक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवल्या आहेत.  

नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व खर्‍या अर्थाने देशातील 138 कोटी भारतवासीयांचं भाग्यच म्हणावे लागेल. राजकारणाचा भाग सोडा पण 75 टक्यापेक्षा अधिक सर्व स्तरातील लोकांची पसंती या नेतृत्वाच्या पाठीमागे आहे. आज ते 72 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.  सेवकाच्या भुमिकेत मानव कल्याण त्यातुन राजकिय व्यवस्थेत तब्बल बारा वर्षे गुजरात मुख्यमंत्री म्हणुन काम केलं आणि आठ वर्षे आता प्रधानसेवक या भूमिकेत कार्य करत आहेत.  समाजातील वेगवेगळ्या वर्गसमुहाचं कल्याण कसं करावं? शेतकरी, कष्टकरी, मजुर, अठरापगड जातीधर्माच्या लोकांच्यासाठी काम केलं पाहिजे ही त्यांची र्‍हदयस्थ भावना त्यातुन पारदर्शक प्रशासन, भ्रष्टाचारमुक्त सुशासन हे गुजरातमध्ये दिसुन आलं. अगदी दुष्काळी पट्यात उदा.गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातल्या  वाळवंटाचं रूपांतर नंदनवनात केलं म्हणजे शेतकर्‍यांच्या शेतीवर नळाद्वारे पाणी घेवुन जाण्याचा केलेला प्रयोग.  2014 नंतर देशाच्या राजकारणात या नेतृत्वाचा झालेला उदय खर्‍या अर्थाने भाग्यच म्हणाव लागेल. पंतप्रधान म्हणुन ‘सबका साथ, सबका विकास’ या सुत्राचा अवलंब करताना गरिबाचं कल्याण, भारतमातेचं रक्षण, सैन्यदलाचं सुदृढीकरण एवढेच नव्हे तर त्यांच्या नेतृत्वाचा उगम अर्थात आपल्या विरोधकांना धडकी भरवणारा ठरला.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कामाची पावती लोकांनी दिली. ज्या पक्षाचे दोन खासदार त्याच पक्षाचे 300 खासदार अधिक तीन केवळ या नेतृत्वाची जादु म्हणावी लागेल. 

             आठ वर्षात देशहिताला आणि सामान्य लोकांच्या कल्याणाला प्राधान्य देताना महत्वाचे जे प्रश्न स्वातंत्र्यानंतर कधीच मार्गी लावले नाहीत किंवा मताच्या राजकारणासाठी तत्कालीन सत्ताधार्‍यांनी या प्रश्नाला हात  घातला नाही. ते या नेतृत्वाने केवळ मार्गी नव्हे तर प्रत्यक्ष निर्णय अंमलबजावणीत आणुन भारतमातेची अस्मिता आणि जनतेचे स्वप्न साकार केले. काश्मिरमधील 370 कलम, अयोध्येत प्रभु रामचंद्र मंदिर उभारणी, तीन तलाक एवढेच नाही तर पाकिस्तान, चीन या शत्रु राष्ट्रांना त्यांची जागा नेहमीच दाखवुन दिली. भारतमाता कुणापुढे झुकत नाही. नव्हे आमचा नाद करायचा नाही हे अगदी प्रत्युत्तर शत्रु राष्ट्रांना कृतीतुन दाखवुन दिलं. 

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना राबवल्या. पेरणी व अन्य खर्चासाठी छोट्या शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाऊ लागु नये म्हणून दरवर्षी सहा हजार रूपये देणारी किसान सन्मान योजना सुरू केली. पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीतून होणाऱ्या नुकसानीसाठी संरक्षण दिले. शेतमालाच्या दळण-वळण व्यवस्थित व्हावे यासाठी पायाभूत सोयी-सुविधाच्या विकासाकडे लक्ष दिले. शेती प्रकल्प उद्योगांना चालना दिली. महिलांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी सर्वात महत्त्वाचे होते ते म्हणजे त्यांना चुलीच्या धुरापासून मुक्त करणे. यासाठी पंतप्रधान उज्वला योजना सुरू केली. महिलांच्यासाठी बचत गटाच्या माध्यमातुन उभा केलेले उद्योग आणि दिलेले प्राधान्य सर्वंकष म्हणावे लागेल.   देशातल्या कानाकोपऱ्यात, खेड्यात जेथे आजवर वीज, पाणि व राहण्यासाठी पक्की घरं नव्हती अशा ठिकाणी कसोशिने प्रयत्न करत या मुलभूत सुविधा पुरवल्या. गाव, खेडी सुधारताना वित्त आयोगामार्फत पंतप्रधान निधी थेट सरपंचाच्या नावावर हा प्रयोग त्यांनी चालु करून गावाला विकासाच्या प्रक्रियेत आणुन दाखविले. समाजातल्या शेवटच्या माणसाचा विकास झाला तरच देश विकासपथावर आहे असे म्हणून शकतो याची त्यांना जाणिव आहे. 
             कोरोना काळात जनतेचे जीव वाचवणे ही प्राथमिकता ठेवून त्यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केला. विरोधकांनी खूप टीका केली पण पण पंतप्रधान मोदी जी यांनी न डगमगता ‘जान है तो जहान या’  असे सांगत कोरोना सारख्या संकटांतून आपल्या देशवासियांनी सुखरूप बाहेर काढले. या लॉकडाऊन काळात अनेक प्रश्न उपस्थित राहीले. मात्र त्या सगळ्यांवर त्यांनी यशस्वीपणे मात केली. आरोग्याच्या सोयी-सुविधा वाढवल्या, कोट्यावधी लोकांना अन्न-धान्य पुरवले, स्थानिक उद्योगांना साथ दिली, उद्योजकतांना आर्थिक सहाय्य दिले, लस निर्मितीवर भर दिला, देशवासियांसोबतच अन्य देशातही लसींचा पुरवठा केला.  त्यांच्या या लढ्याचे कौतुक जागतिक पातळीवरही केले जाते आहे. ही आपल्यासाठी सुद्धा अभिमानाची बाब आहे. 
             सुरक्षेच्या दृष्टिने भारतासमोरील संकट काय असा साधा प्रश्न विचारल्यास त्याचे पहिले उत्तर आहे ते म्हणजे दहशतवाद. आत्तापर्यंत आपण अनेक दहशतवादी कारवायांना सामोरे गेलो आहोत. या भयावह घटनांमुळे घराबाहेर पडायचे म्हणून जीव मुठीत घेऊनच. मात्र सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, चीनच्या कुरापतींना जशास तसे उत्तर देण्याच्या नीतीमुळे एक वेगळी हिंमत, आत्मविश्वास सामान्यांच्या मनात निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. तसेच विविध यंत्रणेच्या सतर्कतेमुळे दहशतवादी कृत्यांनाही अटकाव करण्यात यश मिळत आहे. 
           देशातील नद्यांचं स्वच्छता,  प्रदुषणमुक्त गंगा, स्मार्ट शहरे, प्लॅस्टीकमुक्त पर्यावरण, शौचालये असे अनेक प्रयोग त्यांच्या दुरगामी दृष्टीतुन पुढे आलेले पहायला मिळतात. व्यापार, लघु व्यापार्‍यांचं बळकटीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करत रोजगारनिर्मितीवर भर दिला.  कौशल्यावर आधारीत शिक्षणप्रणाली विकसीत करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण तयार केले. या शैक्षणिक धोरणात ज्ञानाचा सर्वंकष विचार झालेला आहे. चाळीस वर्षानंतर भारताची नव  पिढी ज्ञानाच्या बळावर कशी असेल? हा विचार त्यांनी या धोरणात केलेला दिसतो.  भौतिक सुविधा देशांतर्गत करताना राष्ट्रीय महामार्गाचं जाळं त्यांनी सर्वत्र निर्माण केलं.
            नरेंद्र मोदी हे नेतृत्व म्हणजे अदम्य इच्छाशक्ती, ज्ञानाची प्रगल्भता, कठोर परिश्रम घेण्याची जिद्द, विकासाची भुक, राष्ट्रभक्तीची चाड, गरिबांचे कल्याण, पुरूषासोबतच महिलांच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य, क्रीडा  क्षेत्राचं उदात्तीकरण आणि हे सर्व करण्यासाठी आपण पंतप्रधान आहोत या भुमिकेत न राहाता सेवकाच्या भुमिकेत त्यांचं असलेलं आचरण खर्‍या अर्थाने भारतमातेला सदृढ प्रगतीच्या दिशेने घेवुन जाण्यासाठी अत्यंत फायद्याचं ठरतं. लोकांच्या कल्याणासाठी रात्रं दिवस काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा. आगामी काळात 2024 लोकसभा निवडणुकीत निश्चित चारशे पेक्षा अधिक जागा जिंकुन पुन्हा प्रधानसेवकपदी विराजमान होतील अशी त्यांना सदिच्छा.
(लेखक हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता आहेत.)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post