प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्यावतीने अहमदनगर जिल्हा कारागृहात रक्षाबंधन साजरा

 

     नगर - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अहमदनगर जिल्हा कारागृह वर्ग -2 येथे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी न्यायाधार संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड.निर्मला चौधरी, ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे साईनाथ श्रीगादी, कारागृह अधीक्षक ज्ञानेश्वर काळे, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या बीके निर्मला दिदी उपस्थित होत्या.

     यावेळी बीके निर्मला दिदी म्हणाल्या, आज मनुष्याला मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक या सर्व क्षेत्रात सुरक्षितता आवश्यक आहे. परंतु ही सुरक्षितता मनुष्य मनुष्याला देऊ शकत नाही त्या करिता परमात्मा स्वतः हे कार्य करीत आहे. त्यासाठी दररोज परमात्म्याचे स्मरण करून त्याच्या स्मृतीत चांगले सत्कर्म करावे. यामुळे आपणास मानसिक सुख समाधान लाभते, हीच खरी स्वतंत्रता असल्याचे त्यांनी सांगितले.

     याप्रसंगी अधीक्षक ज्ञानेश्वर काळे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, माणूस मुळात वाईट नसतो, गुन्हेगार नसतो परंतु त्याच्या वाईट सवयी व संगत त्याला गुन्हेगार बनवितात. व्यसनाच्या आहारी गेल्याने मनुष्य वाईट आणि गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतो. या सर्व वाईट गोष्टींपासून परावृत्त राहून पुन्हा चांगल्या गुणांना आचरणात आणून तो पुनः सशक्त बनू शकतो, असे सांगितले.

     कारागृहातील बंदी बांधव तसेच कारागृह अधिक्षक व कर्मचारी बांधवांना ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या बीके. निर्मला दिदी व त्यांच्या सहकारी सुप्रभा, सोनाली, प्रिया यांनी बंदी बांधव व कारागृह कर्मचार्‍यांना राखी बांधल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post