नगर - देशाचे जवान जेव्हा सीमेवर लढतात, देशाचे रक्षण करतात, तेव्हा त्यांच्या पत्नी कुटूंबासाठी असलेली कर्तव्य पार पाडतात. जवान देशासाठी कर्तव्याची भुमिका पार पाडतात. तेव्हा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येन सैन्यात भरती होऊन देश सेवा करुन देशाचा सन्मान वाढवावा, असे प्रतिपादन वीरपत्नी अंबिका भोंदे यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे माध्यमिक विद्यालयात वीरमाता व वीरपत्नी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सुभेदार रामदास भिंगारे, माजी सैनिक शिवाजी गर्जे, शिवाजी पालवे, वीरमाता मिनाक्षी राजेभोसले, फरजाना शेख, लताबाई वारुळे, आदिंसह प्राचार्य भरत बिडवे, रोहिदास चौरे, महेंद्र थिटे, विष्णू मगर, प्रा.वैशाली शिर्के, सविता वाळके, सुजाता दरे, जयश्री केदार, आशा गावडे, वैशाली शेळके, वैशाली वाघुले आदि उपस्थित होते.
श्रीमती भोंडे यांनी सांगितले की, पती देशसेवा करतांना शहिद झाले याचा अभिमान वाटतो. ते हयात नसले तरी समाजाने दिलेला सन्मान प्राप्त होतो.
यावेळी उपस्थितांनी आपली मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी वंदे मातरम्च्या घोषणा देत परिसरातून रॅली काढली. हर घर तिरंगा करीता आवाहन केले.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन दिपक परदेशी यांनी केले तर प्राचार्य बिडवे यांनी आभार मानले.

Post a Comment