आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही एड्स जनजागृती कार्यक्रम व भव्य रॅली संपन्न एड्स जनजागृतीने भविष्यात एचआयव्ही रुग्णसंख्या शून्य गाठू शकतो - डॉ. संजय घोगरे

 

नगर - जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांच्या वतीने 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्ताने युवा वर्गामध्ये जनजागृती करण्याकरिता जिल्हा रुग्णालय बाह्य रुग्ण विभागात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दर्शना बारवकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज घुगे, रुग्णालय व्यवस्थापक डॉ. निलेश गायकवाड, नोडल ऑफिसर डॉ. अरुण सोनवणे,  रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुमय्या खान, डॉ. शिंगारे, प्राचार्य शरद खटके, श्रीमती सुरेखा आंधळे, डॉ.साहेबराव डवरे, डॉ. विक्रम पानसंबळ, शिवाजी जाधव उपस्थित होते.
प्रास्ताविकात जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव म्हणाले, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागामार्फत जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या कामाबाबतची, उपलब्ध असलेल्या सेवा केंद्रांची व त्या सेवा केंद्रामार्फत दिल्या जाणार्‍या सेवा, कोणकोणत्या प्रकारे एचआयव्ही एड्स प्रतिबंध व नियंत्रणाचे काम केले जाते याची माहिती त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त घेण्यात येणार्‍या विविध कार्यक्रम,स्पर्धां व स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मागील वर्षभरात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.
डॉ. विक्रम पानसंबळ यांनी एचआयव्ही संसर्गित रुग्णांना देण्यात येत असलेल्या उपचाराबद्दलची माहिती दिली. डॉ. दर्शना बारावकर यांनी जिल्ह्यात गरोदर मातांसाठी उपलब्ध सोयी सुविधांची माहिती व एचआयव्हीचा संसर्ग बालकांना होऊ नये यासाठी जिल्ह्यात असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती देऊन संसर्ग होण्याचे प्रमाण या प्रयत्नांमुळे अत्यंत कमी झाल्याचे नमूद केले.
डॉ.संजय घोगरे  यांनी युवकांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता पुढाकार घेण्याचे आवाहन करुन युवकांनी जर एचआयव्ही बाबतचे ज्ञान प्राप्त केल्यास त्यांच्यापर्यंत एच आय व्हीचा संसर्ग होऊ शकत नाही. आणि त्यांच्याकडे असलेले ज्ञान त्यांनी इतरांना दिल्यास निश्चितच भविष्यात एचआयव्ही बाबत आपण शून्य गाठू  शकतो. याकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाकडून वेळोवेळी आयोजित कार्यक्रम, स्पर्धेमध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे.  भविष्यातील ऐक्यासाठी उत्तम जगाची निर्मिती करणे  या आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या घोषवाक्याच्या अनुषंगाने युवकांना एचआयव्ही एड्स च्या विरोधात आपली वज्रमूठ भक्कम करून भविष्यातील ऐक्यासाठी एचआयव्ही मुक्त उत्तम जगाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक व मान्यवरांकडून एचआयव्ही एड्स जनजागृती बाबतची शपथ देण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाच्या आवारात विद्यार्थ्यांच्या रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.  सदर रॅली ही जिल्हा रुग्णालयपासून नगर शहरात काढण्यात येऊन परत जिल्हा रुग्णालय या ठिकाणी येऊन समारोप करण्यात आला.  सदर रॅलीमध्ये रेसिडेन्शिअल ज्युनियर कॉलेज अहमदनगर, न्यू आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज, नर्सिंग कॉलेज,  सिव्हिल हॉस्पिटल व शहरातील इतर महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.  रॅलीमध्ये स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव तसेच एचआयव्ही प्रतिबंध अनुषंगाने विविध प्रकारच्या घोषणा देऊन  जनतेमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेवटी आभार नवनाथ लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अमृतवाहिनी ग्राम विकास मंडळ यांच्यामार्फत एच आय व्ही प्रतिबंध बाबत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय युवा दिन कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रॅलीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे  राधाकिशन पाटोळे, नवनाथ लोखंडे, प्रवीण देठे, आयसीटीसीचे समुपदेशक राहुल कडूस, सविता बेलेकर, विनय इदे, शर्मिला म्हस्के, भक्ती सामलेटी, विजय राऊत, गणेश गोत्राळ, रणधीर भिसे, तृप्ती पठाडे, राकेश गोहेर इत्यादींनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post