सुट्टीच्या दिवशीही डाक विभागाचे वतीने राखी वाटपासाठी विशेष मोहीम मोहरमची सुट्टी असताना कर्मचाऱ्याचा उस्फुर्त प्रतिसाद




केडगाव : बहीण भावाच्या अतूट  नात्यातील पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन..!!

बहिणीने पाठवलेली राखी भावाच्या हाती वेळेवर मिळावी,

याकरिता आज मोहरमच्या सुट्टीच्या दिवशीही  डाक विभागाच्या वतीने  राखी वाटपासाठी विशेष मोहीम राबवली आहे.

नोकरी ,व्यवसायानिमित्ताने अनेकांना आपल्या घरापासून दूर राहावे लागते. अश्या वेळी पोस्टाने राखी पाठविण्यास प्राधान्य दिले जाते. या सर्वच राख्या सुरक्षितपणे वेळेत पोहचविण्यासाठी डाक विभाग नेहमीच प्राधान्य देत असते.

रक्षाबंधन हा सण अगदी जवळ  आल्याने,व आज मोहरमची सुट्टी असतानाही,डाक विभागाने राखी वाटप करण्यासाठी विशेष मोहीम राबवली,या मोहिमेद्वारे अहमदनगर शहरातील सर्वच डाकघराकडून  आलेल्या सर्व राख्या भाऊरायाकडे पोहच केल्या.

 आजच्या दिवशी केडगाव पोस्टऑफिसमध्ये रजिस्टर्ड पोस्ट, स्पीड पोस्ट व सध्या पोस्टाने आलेल्या सर्व राख्या वितरणा पोस्टमनद्वारे वितरित करण्यात आल्या.रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या लाडक्या बहिणीने पाठवलेली राखी  भाऊरायाच्या हाती मिळताच  त्याच्या चेहऱ्यावरील आनंद निश्चितच समाधान देणारा होता.

ही विशेष मोहीम केडगाव पोस्टऑफिसमध्ये  संतोष यादव सबपोस्टमास्तर यांनी  शिवाजी कांबळे,अंबादास सुद्रीक,स्वप्नील पवार, संजीव पवार,अनिल धनावत , सूर्यकांत श्रीमंदिलकर , बाबासाहेब बुट्टे या पोस्टमनबांधवाच्या  उस्फुर्त सहकार्यमुळे ही विशेष मोहीम यशस्वी केली.

बाईट:

बहीण भावाच्या अतूट नात्याला अजून घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या लाडक्या बहिणीने,भाऊरायाला पाठवलेली राखी मिळताच भाऊरायाच्या चेहऱ्यावरील समाधान  हे निश्चितच आनंद देणारे असते.


संतोष यादव

पोस्टमास्तर

केडगाव

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post