डॉ.ना.ज.पाउलबुधे पॉलिटेक्निकमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे विद्यार्थ्यांची निवड

 
नगर - नगरमध्ये पाउलबुधे पॅटर्न म्हणून नावाजलेल्या डॉ.ना.ज.पाउलबुधे पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी नगर एमआयडीसीमधील ए.सी.ई.न्यूमॅटिक्स कंपनीच्यावतीने कॅम्पस इंटरव्ह्युचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर सुनिल पडतुरे, सेफ्टी अ‍ॅसेब्ली मॅनेजर श्री.शेट्टी, प्रॉडक्शन मॅनेजर व्हीक्टर डिसोजा आदि उपस्थित होते. त्यांना पाउलबुधे पॉलिटेक्निकचे मेकॅनिकल इंजिनिअरिंग  विभागप्रमुख जे.बी.अली, ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट अधिकारी विश्वनाथ अदावडे यांनी सहाय्य केले.
यावेळी सुनिल पडतुरे म्हणाले, ए.सी.ई. न्यूमॅटिक्स ही कंपनी हायड्रॉलिक ब्रेकर व त्याला लागणारे सुटे भाग निर्यात करते. या कंपनीत तज्ञ व नवोदितांना काम करण्याची संधी मिळत असते. ही संधी यावेळी पाउलबुधे पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती. आज निवड झालेले विद्यार्थी पुढील काळात यशाच्या शिखरावर गेलेले असतील. यापुढेही अशीच संधी इतरांनाही देण्यात येणार असल्याचे श्री.पडतुरे यांनी सांगितले.
यावेळी निवडक 22 विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू घेण्यात आला. त्यातील कु.भक्ती शेकडे, योगेश आमले, शशिकांत हिकरे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तर काहींना प्रतिक्षा यादीवर घेण्यात आले. 
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे  सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनय पाउलबुधे, सदस्य साई पाउलबुधे, प्राचार्य बाळासाहेब बोर्डे आदिंनी अभिनंदन केले.
---------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post