डॉ.हेमंत कुलांगे यांना पुणे विद्यापीठाची पी.एच.डी.

 

नगर - भिंगार येथील फॅमिली फिजिशियन व अहमदनगर महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ.हेमंत बबन कुलांगे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी.एच.डी. मिळाली. त्यांनी मानसशास्त्र या विषयात संशोधन केंद्र, मानसशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ अंतर्गत संशोधन करुन प्रबंध सादर केला होता.

डॉ.हेमंत कुलांगे यांना प्राचार्य डॉ.पी.व्ही.रसाळ,  डॉ.व्ही.एफ.देसले, डॉ.प्रितमकुमार बेदरकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post