महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी यांना आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या महत्वपूर्ण सूचना

 
अहमदनगर - शहरात मुसळधार पावसामुळे शहरात विविध ठिकाणी पाणी शिरले तसेच पूर आलेल्या ठिकाणची पाहणी करून अहमदनगर महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन व सर्व प्रमुख अधिकारी यांची आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी शुक्रवार दिनांक ५ ऑगस्ट २०२२ रोजी तातडीने बैठक घेतली.
सुरवातीस आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडे तसेच प्रभाग समिती कार्यालय येथे किती कर्मचारी आहेत,साधन सामग्री किती आहे याची आयुक्त यांनी माहिती घेतली
त्यानुसार आपत्कालीन व्यस्थापन कक्षाकडे हायड्रोलीक शिडी,कर्मचाऱ्यांना फायरसुट, लाईफ जॅकेट १००,लाईफ बॉय (रिंग ) २०,रोप १०० मीटर चे प्रत्येकी २,टॉर्च ६०, आहेत अशी माहिती दिली तसेच आपत्कालीन परिस्थितीत पाणी हटवताना ड्रेनेज लाईनचा अडथळा येतो. नागरिकांची ताबडतोब पाणी हटविण्याची मागणी असते परंतु पाऊस चालू असल्यास कामात व्यत्यय येतो म्हणून पाऊस थांबल्यांनातर पाणी काढण्याची कारवाई केली जाते असे व्यवस्थापन प्रमुख श्री.शंकर मिसाळ यांनी माहिती दिली.जल अभियंता श्री.परिमल निकम यांनी माहिती दिली की लोकमत भवन जवळील ओढ्या लगत चार जलवाहिन्यांचे पाईप वाहून गेल्याचे निदर्शनास आले नंतर तातडीने पाहाणी करून दुरुस्तीचे काम हाती घेतले.तसेच बालिकाश्रम रोडवरीलवरक्तहे मळा येथील पुलाचा कठडा तुटल्याने पाईपलाईन नादुरुस्त झाली नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणुन टँकरद्वारे पाणी वाटप करण्यात आले.नालेगाव परिसरात वरुळाचा मारुती परिसरात सीना नदी पुलावर साधारणतः १६ पाईप निघाले होते त्यापैकी १२ पाईप शोधण्यात आले पावसाचा प्रवाह जास्त असल्यामुळे पाणी ओसरल्यावर उर्वरित पाईप शोधण्यात येतील याच बरोबर पिंपळगाव माळवी येथील महापालिकेच्या मालकीचा तलाव पूर्ण भरला आहे.यावर आयुक्त साहेब यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सांडव्यावरून जाताना नागरिकांनी सावकाश व काळजीपूर्वक वाहतूक करावी तसेच मनपा अधिकारी यांनी तलाव व तलाव परिसराची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
तसेच शहर अभियंता श्री.सुरेश इथापे यांनी आयुक्त डॉ जावळे यांचे बरोबर मोहरम मार्ग रस्ता पॅचिंगचे कामाची पाहणी केली तसेच शहरामध्ये शनिचौक येथील जुने बांधकामाचा काही भाग रस्त्यावर गल्लीच्या लगत पडला होता तो बांधकाम विभागाने तातडीने हटविला.
अतिक्रमण विभाग प्रमुख श्री.रोहिदास सातपुते यांनी माहिती दिली की  शहरातील ओढे नाले जेसीबी च्या साहाय्याने साफ करण्यात आले,ज्या ठिकाणी पूल आहेत तेथील पाणी जाण्यासाठी येणारे अडथळे दूर केले, शहरातील रस्त्यावरील अतिक्रम ,टपऱ्या दूर केल्या,मोहरम मार्गावरील अतिक्रम काढले.ज्या ओढ्यांवर अतिक्रम आहे किंवा लाईटची DP आहे त्या बाबत नगर रचना विभागाने पाहणी करून अहवाल द्यावा असे आयुक्त डॉ जावळे यांनी सांगितले
या नंतर बैठकीत प्रभाग समिती निहाय कर्मचारी व साधन सामग्री बाबत प्रभाग अधिकारी यांनी माहिती दिली
प्रभाग समिती क्रमांक १ कडे ९ कर्मचारी,आरोग्य विभागाचे २० कर्मचारी,दोन स्वछता निरीक्षक,११ केअर टेकर आहेत सर्वांना ऑन कॉल उपस्थिती बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रभाग समिती मध्ये पाणी साठणारे १४ ठिकाणे आहेत नरहरी नगर येथील पाणी जाण्यासाठी दोन तास लागले तर हायवेवरील पाणी जाण्यासाठी मार्ग नाही त्यावर उपाय योजना सुरू आहे असे श्री.जितेंद्र सारसर यांनी सांगितले.
प्रभाग समिती दोन मध्ये ६० कर्मचारी टीम आहे तीन शिफ्ट मध्ये प्रत्येकी २० कर्मचारी १० केअर टेकर अशी टीम करण्यात आली आहे.शिवाजी नगर, कल्याण रोड परिसरात नदीच्या प्रवाहाचे पाणी मुळे काही काळ अडचण निर्माण होते असे प्रभाग अधिकारी श्री.राकेश कोतकर यांनी सांगितले
प्रभाग समिती क्रमांक ३ मध्ये २ स्वछता निरीक्षक,५ केअर टेकर,१४ सफाई कर्मचारी, आहेत अशी माहिती प्रभाग अधिकारी श्री.मेहेर लहारे यांनी दिली.
प्रभाग समिती क्रमांक ४ कडे २ स्वछता निरीक्षक८ केअर टेकर,व ४५ कर्मचारी आहेत.सारस नगर भागात पाणी साठणारी सात ते आठ ठिकाणे आहेत.केडगाव भागात दोन ठिकाणे,अंबिका नगर येथील ओढा बुजल्यामुळे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होतो.अशी माहिती प्रभाग अधिकारी .नानासाहेब गोसावी यांनी दिली.सदर ठिकाणी राखीव पंप उपलब्ध केला जाईल असे आयुक्त डॉ जावळे यांनी सांगितले.
उद्यान विभाग मार्फत शहरातील उन्मळून पडलेली झाडे तात्काळ हटविण्यात अली असून कर्मचारी ५ आहेत आपत्कालीन परिस्थितीत आपत्कालीन कक्ष प्रमुख श्री.शंकर मिसाळ यांची व काही खाजगी यंत्रणेची मदत घेतली जाते असे उद्यानप्रमुख शशिकांत नजान यांनी सांगितले.
बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी खालील प्रमाणे निर्देश दिले.
१)चारही प्रभाग अधिकारी यांनी पाणी अडल्याची ठिकाणे, पाईप टाकून ओढा बंद केलेली ठिकाणांची यादी तात्काळ नगर रचना विभाग यांचे कडे द्यावी.
२)नगर कल्याण रोड वर नदीचे पाणी वाहत असल्याने पुलावरून प्रवास केल्यास जीवित हानी होऊ शकते.यासाठी पुलावरून नागरिकांनी प्रवास करू नये  यासाठी पोलीस बंदोबस्त देणेबाबत मा.पोलीस अधीक्षक यांना तात्काळ पत्र देण्याबाबत बांधकाम विभागाने कार्यवाही करावी व एक प्रत मा.जिल्हाधिकारी यांना द्यावी.तसेच स्वयंसेवकांची नेमणूक करावी.
३) वरुळाचा मारुती परिसरातील पाण्याचे पाईप उचलून घ्यावीत
४)अतिरीक्त पंप घेणेस तात्काळ कोटेशन मागवून स्टोअर विभाग मार्फत डिझेल वर चालणारे पंप घ्यावेत.
५)आरोग्य विभाग मार्फत पाणी साठलेल्या ठिकाणी औषध,पावडर फवारणी,ऑइल टाकणे,धूर फवारणी तातडीने सुरू करावी.
६) पार्किंग लेव्हल मधील पाणी उपसण्या बाबत प्रभाग अधिकारी यांना नागरिकांनी संपर्क साधावा असे कॉल आल्यावर त्वरित अधिकारी यांनी पाण्याचा मार्ग मोकळा करून,पाणी वाहते करानेत यावे.
७)आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना स्थलांतरित करून इतरत्र निवारा उपलब्ध करून देणे साठी जवळील शाळा खोल्यांच्या चाव्या प्रभाग अधिकारी यांनी जवळ उपलब्ध ठेवाव्यात.प्रसंगी या नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करणे साठी शहरातील दानशूर व्यक्ती,स्वयंसेवी संस्था यांचेशी संपर्क ठेवून मदत तयार ठेवावी.या शाळांमधील लाईट,पाणी, साफसफाईची पूर्वतयारी करावी.
नागरिकांना वाहतुकीसाठी वाहन विभाग यांनी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देणेची कार्यवाही करावी.
८) नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहावे यासाठी हवामान खात्याचा अंदाज घेऊन.काळजी घेणे बाबत वृत्तपत्रात जाहीर आवाहन प्रसिद्ध करणेत यावे.
९)पिंपळगाव माळवी तलाव पूर्ण भरला असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे.त्यावरून प्रवास करताना नागरिकांनी दक्षता घ्यावी या बाबत वृत्तपत्रात प्रसिद्धी देण्यात यावी.
वेळोवेळी प्रसिद्धी माध्यमे,व्हाट्सएप,ग्रुप वर संदेश प्रसारित करण्यात यावेत.
९)नगर रचना व बांधकाम विभागाने अस्तित्वातील किती नाले बुजविले,याची यादी सादर करावी.पुन्हा एकदा सर्व्हे करण्यात यावा.पूर्वीच्या ओढ्याचे स्वरूप व आत्ताच्या ओढ्यांचे स्वरूप दर्शविण्यात यावेत फोटो घेण्यात यावेत.
१०) अतिक्रमण विभागाने नालेसफाईची संपूर्ण माहिती तात्काळ सादर करावी.
११) घनकचरा विभागाने मनुष्य बळाद्वारे केलेल्या नालेसफाई बाबतची माहीती सादर करावी.
१२)उद्यान विभागामार्फत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ठिकाणचे फांद्या,झाडपाला उचलून घेण्यात यावा.या कामास प्राधान्य द्यावे.खाजगी यंत्रणेचे मोबाईल क्रमांक जाहीर करावेत.खाजगी जागेत  फांद्या उचलण्या बाबत सूचना उद्यान विभागास  देण्यासाठी नागरिकांनी उद्यान विभाग प्रमुख यांना ९८५०१४६६११ या क्रमांकावर संपर्क साधावा
१३) नारळाच्या झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडलेल्या फांद्या उचलून घेणेबाबत घनकचरा विभागाने कचरा वाहतूक व संकलन ठेकेदार यांना सूचना द्याव्यात.त्यांचेकडून कारारनाम्यातील अटी शर्तीनुसार ठेकेदार संस्थेची जबाबदारी आहे.त्यांचे कडून अटी शर्तीची अंमलबजावणी होत नसेल तर त्या संस्थेवर दंडात्मक कारवाई करावी.
सार्वजनिक ठिकाणी पाला पाचोळा फांद्या टाकणाऱ्यांवर घनकचरा विभागाने दंडात्मक कारवाई करावी.
१४) उद्यान विभागास आरोग्य विभागाकडील चार ट्रॅक्टर  व आस्थापना विभागाने ड्रायव्हर उपलब्ध करून घ्यावेत.
१५) आपत्कालीन व्यवस्थापन  संबंधित कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरू राहतील.तसेच सर्वांचे मोबाईल सुरू राहतील याबाबत सामान्य प्रशासन विभागाने आदेश द्यावेत.
१६) दररोज एक अधिकारी यांची आपत्कालीन परिस्थितीवर देखरेखीसाठी नेमणूकआस्थापना विभागाने करावी.
वाहन विभागा मार्फत त्यांना वाहन  उपलब्ध करून द्यावे.नियुक्त अधिकारी यांनी ग्रुप वर रिपोर्टिंग करावी.
१७) कल्याण रोड पुलावरील वाहतूक इतरत्र वळविणे बाबात वाहतूक शाखेस पत्र द्यावे.या ठिकाणी सूचनांचा डिजिटल बोर्ड लावणे बाबत बांधकाम विभागाने कार्यवाही करावी.
१८) ध्वनिक्षेपका द्वारे वेळोवेळी नागरीकांना आवाहन करणेसाठी साहित्य प्रभाग अधिकारी यांना प्रसिद्धी विभागाने उपलब्ध करून द्यावे.
१९)मा.महिला बालकल्याण समितीने मंजूर केलेले फायबर टॉयलेट बसविण्याबाबत प्रस्ताव सादर मंजुरी नुसार उद्यान विभागाने पुढील कार्यवाही करावी
२०) यापुढे बांधकाम विभागाशी संबंधित खरेदी बाबतचे प्रस्ताव सादर करताना शहर अभियंता यांचा अभिप्राय घेऊन सादर करणेबाबत आदेश निर्गमित करणेत यावेत.
अशी सूचना व मार्गदर्शक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी अधिकारी यांना केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. .प्रदीप पठारे,उपयुक्त डॉ..श्रीनिवास कुरे
सहायक आयुक्त .सचिन राऊत
नगर रचनाकार .राम चारठनकर, शहर अभियंता .सुरेश इथापे,आरोग्य अधिकारी डॉ..अनिल बोरगे,जल अभियंता . परिमल निकम,
अतिक्रमण विभाग प्रमुख श्री.रोहिदास सातपुते,अस्थपणा विभाग प्रमुख श्री.अशोक साबळे
घनकचरा विभाग प्रमुख डॉ.श्री.शंकर शेडाळे
आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष प्रमुख श्री.शंकर मिसाळ
प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर ,राकेश कोतकर,मेहर लहारे नानासाहेब गोसावी,विद्युत विभाग प्रमुख वैभव जोशी
स्टोअर विभाग प्रमुख .अशोक जाधव
प्रसिद्धी व उद्यान अधिकारी शशिकांत नजान उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post