अहमदनगर (प्रतिनिधी) : भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन सभेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे होते.*
यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, स्व. राजीव गांधी यांनी देशामध्ये तंत्रज्ञानाचे युग आणले. देशामधील तरुणांना अधिक सक्षम करण्याचे काम केले. देशातील लोकशाही बळकटीकरण तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीमध्ये राजीव गांधींचे अतुलनीय योगदान आहे.
आजचा आधुनिक भारत आणि तंत्रज्ञानातील झालेल्या क्रांतीची मुहूर्तमेढ राजीवजी यांनी रोवली होती हे विसरून चालणार नाही. राजीवजींचे विचार काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजे, असे आवाहन यावेळी काळे यांनी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.
यावेळी शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष प्रवीणभैया गीते पाटील, शहर महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, राणीताई पंडित, अभिनय गायकवाड, इंजिनीयर सुजित क्षेत्रे, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, इम्रानभाई बागवान, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, राहुल गांधी विचार मंचाचे शहर अध्यक्ष सागर ईरमल, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पै. दीपक जपकर, निलेश चक्रनारायण, उमेश साठे, मनोज वाळके आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment