केडगाव: भारतीय डाक विभागाच्या वतीने पाच वर्षांच्या आतील बालकाचे आधार कार्ड नोंदणी विनामूल्य केली जाते.
कृष्णजन्माष्टमीचे औचित्य साधत केडगाव पोस्ट ऑफिसच्या वतीने एकता कॉलनी मधील अंगणवाडी क्र पाच मध्ये विशेष मोहीम आयोजित केली होती.या मोहिमेत सत्तावीस
बाळगोपाळाचे *बालआधाराची* नोंदणी करत कृष्णजन्माष्टमी उत्सव या बाळगोपाळासमवेत साजरी केली.
आजपर्यंत केडगाव परिसरातील अंगणवाडी मध्ये अशी मोहीम आयोजित करत बाल आधार नोंदणी केलेली असून यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे.
केडगाव पोस्ट ऑफिस मधील पोस्टमन बांधव यांचेद्वारे आपले टपाल वाटपाचे नियमित कामकाज पूर्ण करत सायंकाळी चार ते सहा वेळेत ही मोहीम श्री संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजीव पवार, श्री शिवाजी कांबळे,श्री स्वप्नील पवार,श्री अंबादास सुद्रीक,श्री सूर्यकांत श्रीमंदिलकर श्री अनिल धनावत यांचे विशेष सहभागाने ही विशेष मोहीम यशस्वी झाली.
यासाठी अंगणवाडी सेविका श्रीमती मनिषाताई गायकवाड यांचे विशेष सहकार्य मिळाले.
*चौकट*
आजवर केडगाव परिसरात सातत्याने मोहिमेचे आयोजन करत मोठया प्रमाणात बाल आधाराची नोंदणी केलेली असुन,आजच्या विशेष दिनी केलेली नोंदणी ही निश्चितच अभिमानस्पद आहे.
Post a Comment