धनगर समाजातील मुलाच्या शिक्षणासाठी विभागनिहाय वसतीगृहासह अदिवासी विभागाच्या धर्तीवर २२ योजनाना मंजुरी : माजी मंत्री प्रा राम शिंदे

 अहमदनगर (प्रतिनिधि) : राज्य सरकारने  धनगर समाजातील मुलाच्या शिक्षणासाठी विभागनिहाय वसतीगृहासह अदिवासी विभागाच्या धर्तीवर २२ योजनाना मंजुरी दिल्याचा आदेश काढला असल्याची माहीती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नववे वंशज तथा पहिले ओबीसी माजी मंत्री प्रा राम शिंदे  यांनी दिली आहे .
    धनगर समाजाला एसटीचे आरक्षणाची अंमल बजावणी व्हावी ही समाजाची मुख्य मागणी आहे मात्र या मागणीला काही कारणाने उशीर होत असल्यांने आम्ही समाजाची प्रगती होण्यासाठी एसटी च्या सवलती लागु करण्यांची मागणी तत्कालिन मुख्यमंत्री देवेद्र फडणविस यांच्याकडे केली होती . शवटी  १०००कोटी रुपयाांचा निधी   या योजनेसाठी मंजूर करण्यात आला होता.मात्र नंतर या योजनेला स्थगिती दिल्याने नााराजी व्यक्त होत होती.आता नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयांवर चर्चा केली असता                 सरकारने खालील बारा योजनांचा शासन आदेश काढला असुन सर्वानी योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केले आहे .
 योजना पुढील प्रमाणे
१ )भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे, नागपूर , अमरावती या महसूली विभागांच्या ठिकाणी वस्तीगृह निर्माण करणे.

२ ) वसतीगृहापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वीत करणे.

३ ) गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देणे.

४ ) धनगर समाजाच्या बेघर कुटुंबियांना १०,००० घरकुले बांधून देणे.
५ ) समाजासाठी आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पीत निधी उपलब्ध नसलेल्या कार्यक्रम / योजना राबविण्यासाठी न्युक्लियस बजेट योजना राबविणे . 
  ६ ) समाजातील युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मुलभूत प्रशिक्षण देणे.

७ ) केंद्र शासनाच्या स्टैंड अप इंडिया योजनेतर तर भटक्या जमाती क या प्रवर्गातील नवउद्योजकांन सहाय्य करणसाठी मार्जिन मनी उपलब्ध करून देणे.

८ ) होतकरू बेरोजगार पदवीधर युवक-युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षा /निवासी प्रशिक्षण देणे.

९ ) समाजातील बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परिक्षासाठी परिक्षा शुल्क आर्थिक
सवलती लागू करने .

१० ) ७५ टक्के अनुदानावर ४ आठवडे वयाच्या सुधारीत देशी प्रजातीच्या १०० कुकुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य देणे.

 ११ )धनगर समाजातील भूमीहीन मेंढपाळ कुटुंबांसाठी अर्धबंदिस्त आणि बंदिस्त मेंढी पालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे. किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तथा अर्थ सहाय्य देणे.

१२ ) मेंढपाळ कुटुंबाना पावसाळयात चराई करण्याकरीता जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीसाठी अनुदान देणे.

या महत्वाच्या योजना लागु करण्यांत आल्या असुन यांची अमलबजावणी करण्यांचे आदेश शासनाने संबंधीत विभागाला दिले आहेत . 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post