अहमदनगर (प्रतिनिधि) जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगाव ने संचलित पार्वतीबाई म्हस्के प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. महार रेजिमेंटचे माजी सैनिक जगन्नाथ पंचमुख यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्याध्यापक श्री दत्तात्रय झगडे सर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास श्री सुरेश परदेशी साहेब व श्री बाजीराव जाधव सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे, देशभक्तीपर गीत - गायन अतिशय सुंदर रित्या सादर केले. अमृत महोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धा, राखी स्पर्धा , चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या , घेतलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माजी सैनिक पंचमुख मेजर यांनी आपले आर्मीतले अनुभव मुलांना सांगितले. कार्यक्रमास पालकांची तसेच माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. पाहुण्यांनी सर्व मुलांचे कौतुक केले स्वातंत्र्याच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी शैलजा कर्डिले, वंदना खिंदारे , हर्षा थोरात , ज्योती सोनवणे , जयश्री कुलकर्णी, दिपाली नेहुल हे उपस्थित होते , सूत्रसंचालन रुपाली बर्वे यांनी केले तर आभार शकील सय्यद यांनी मानले.
Post a Comment