सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान भगवान गोगादेव- सुनिल त्र्यंबके संदेशनगर साई मंदिरात 11 मानाच्या निशाणची पुजा

 
नगर - भगवान गोगादेव हे राजस्थानचे लोकदैवत आहेत, गुरु गोरक्षनाथांचा जप व 12 वर्षाच्या तप साधनेनंतर राणी बाछल यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन भगवान गोगादेव जन्माला आले. तेहतिस कोटी देवतांचे आयुष्य आणि नागराज वासुकीचे मुळ जीव असल्यामुळे पद्मनाग अवतार श्री भगवान गोगादेव हे सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान आहे, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.
वसंत टेकडी येथील संदेशनगरमध्ये साई मंदिरात नगर आणि भिंगार शहरातील 11 मानाचे निशाण साई मंदिरात मिरवणुकीने आले. यावेळी श्री.त्र्यंबके यांच्या हस्ते पुजा करुन भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, भिंगार येथील वाल्मिक समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष रवीभैय्या मोरकरोसे, साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे, बबलू सुर्यवंशी, किशोर वाणे, दिपक कुडिया, संदिप करोलिया, संतोष टाक, आदिंसह भाविक उपस्थित होते.
याप्रसंगी रविभैय्या मोरकरोसिया यांनी विरगोगा देवांविषयी माहिती देतांना सांगितले, राणी बाछल यांना स्वप्न पडून भगवान शिवच्या आदेशानुसार गुरु गोरक्षनाथांची भक्ती करण्याचे संकेत दिले. ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या आदेशानुसार 33 कोटी देवतांचे एक-एक दिवसांचे आयुष्य घेऊन गुगलरुपी फळात पद्मनाग अवतार भगवान गोगादेव जन्माला आले. त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त भिंगार येथील सहा आणि नगर शहरातील पाच असे आकरा मानाचे निशाण मिरवणुकीने 19 तारखेला भिंगार येथे आणि 20 तारखेला सर्जेपुरा येथे गोगादेव मंदिरात जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा होणार असल्याचे रविभैय्या यांनी सांगितले.
-------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post