रक्तदाना विषयी सकारात्मक प्रतिसाद हवा - विलास शिंदे देवगांवला तरुणांनी रक्तदान करुन मित्राला श्रद्धांजली अर्पण

नगर - रक्तदान करणे, न करणे ही प्रत्येकाची ऐच्छिक बाब आहे. परंतु अनेकदा केवळ गैरसमाजांमुळे रक्तदान करत नाही. एका व्यक्तीच्या रक्तदानाने तीन लोकांचा जीव वाचला जाऊ शकतो. रक्तदानाने इतरांना जसा फायदा होतो, तसा आपल्याला होत असेल तर या विषयी सकारात्मक प्रतिसाद हवा, असे प्रतिपादन नगर बाजार समितीचे माजी सभापती विलास शिंदे यांनी केले.
नगर तालुक्यातील देवगांव येथील गेल्या वर्षीच उमेदीच्या काळात तरुण सामाजिक कार्यकर्ते गणेश विश्वनाथ शिंदे यांचे निधन झाले. मित्राचा स्मृतीदिन रक्तदान करुनच श्रद्धांजली अर्पण करायचा असा संकल्प देवगाव मित्र मंडळ, एम.आर. व्हेटनरी ग्रुप आणि नगरच्या मित्र परिवाराने करत 35 रक्त पिशव्यांचे संकलन केले. 
याप्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, देवगांवचे सरपंच संभाजी वामन, उपसरपंच हरिदास खळे, रावसाहेब वामन, संजय वामन, मच्छिंद्र जाधव, विजय शिंदे, अमोल तांदे, रमेश शिंदे, विठ्ठल वामन, मच्छिंद्र शिंदे, शशिकांत भालेराव, अमोल शिंदे, पैलवान वैभव जाधव, कानिफनाथ शिंदे, अर्जुन शिंदे, अंकुश वामन आदिंसह बाजार समितीचे सभापती, संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्वांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले.
पुढे बोलतांना विलास शिंदे म्हणाले,  रक्तदान केल्याने रक्ताचा प्रवाह सुधारतो, ब्लड वेसल्सच्या लायनिंग डॅमेज होत नाही. शरीरातील आर्टरी ब्लॉकेज कमी होतात, त्यामुळे रक्तदान करणार्यांना हार्ट अॅ्टकचा धोका कमी होतो. मग एवढा फायदा आपल्याला होतो तर मग रक्तदान का करु नये? असा प्रश्न त्यांनी केला. रक्तदानाने नवीन पेशींच्या उत्पादनावर सकारात्मक प्रभाव दिसून येतो, त्यामुळे आपले शरीर निरोगी राहून उत्साह वाढतो, असे ते म्हणाले.
अष्टविनायक ब्लड बँकेच्या डॉक्टर्स, सिस्टर व कर्मचारी यांनी व्यवस्था करुन रक्तदात्यांनाा चांगला दिलासा मिळाला. यासर्व ग्रुपचे मोठ्या प्रमाणवर रक्तदान केल्याबद्दल या सर्वांचे रमेश शिंदे यांनी आभार मानले.
---------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post