श्री मार्कंडेय मंदिरात समाज बांधवांच्या बैठकीत एकमताने निर्णय
नगर - गेल्या दोन वर्षांपासून जगावर आलेल्या कोरोना महामारीच्या जीवघेण्या संकटामुळे सर्व सण, उत्सव यांच्या अयोजनावर मर्यादा आल्या होत्या. यंदा शासनाकडून काही नियम व अटींच्या अधीन राहून उत्सव अयोजनाला परवानगी मिळली आहे. तेव्हा यंदा समस्त पद्मशाली समाजाच्या वतीने नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने महर्षी मार्कंडेय महामुनी उत्साव व नारळी पौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात येणार आल्याची माहिती मार्कंडेय देवस्थान कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर विठ्ठलराव मंगलारम यांनी दिली. इथल्या मार्कंडेय मंदिरात समस्त समाज बांधवांच्या आयोजित करण्यात आलेल्या मिटिंगमध्ये ते बोलत होते.
कोविड विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे लॉकडाऊनही करण्यात आला होता त्या काळात सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद होती. या संकट काळात दोन वर्षेआपल्या पद्मशाली समाजचे कुलदैवत चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनीचा रथोत्सव कार्यक्रमही रद्द करण्यात आला होता. आज परिस्थिती सामान्य झाल्यावर आपण त्याचे पुन्हा आयोजन करत आहोत. तरी समस्त पद्मशाली बांधवानी आपल्या या उत्सवात कोरोना महामारीच्या सर्व नियमांचे पालन करत सक्रिय सहभाग नोंदवावा. या दिवशी आपल्या परंपरे प्रमाणे सडा रांगोळी व घराला तोरण बांधून प्रत्येकाने रथोत्सवात हिरिरीने सहभागी व्हावे, असे ही आवाहन त्यांनी यावेळी केले.
गुरुवार दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त श्री मार्कंडे मंदिरात सकाळी 7 वाजता रुद्राभिषेक, 9 वाजता होम हवन, 11 वाजता यज्ञोपवित धारण, 11.30 वाजता रक्षाबंधन, दुपारी 2 वाजता श्री मार्कंडेश्वराचे पालखी मिरवणूक रथोत्सव, रात्री 9 वाजता मिरवणुकीचे सांगता श्री मार्कंडेय मंदिर गांधी मैदान येथे होईल व महाआरती होऊन प्रसाद वाटप करण्यात येणार असल्याचे देवस्थान कमिटीच्या वतीने सांगण्यात आले
संजय वल्लाकट्टी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कमिटीचे सचिव कुमार आडेप, त्रिलेश येनगंदुल , रघुनाथ गाजेंगी, शिवाजी संदुपटला, रवी दंडी, अजय म्याना, श्रीनिवास बुरगुल, शुभम सुंकी, योगेश ताटी, सुमित ईपलपेल्ली, शंकर नक्का, शंकर जिंदम, किरण वल्लाकट्टी, उदय सुरम यांच्या सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
Post a Comment