मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आ.राम शिंदे कडून सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागावल्या जुन्या आठवणी

 
नगर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाजपाचे कोअर कमिटी सदस्य माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे यांनी सत्कार केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिवेआगार येथील सोन्याच्या गणपती मुर्तीच्या चोरीच्या घटनेवरुन केलेल्या आंदोलनाची आठवणी ताज्या केल्या. 
24 मार्च 2012 रोजी दिवेआगार येथील सोन्याच्या गणपतीच्या मुर्तीची चोरी झाली होती. कोकणातील जागृत देवस्थान म्हणून दिवेआगार सुप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सोन्याच्या मूर्ती असलेल्या मंदिरापैकी हे एक मंदिर सुपरिचित आहे. याचा चोरी प्रकरणी पोलिसांकडून तपासाला गती मिळत नव्हती. त्यावेळी अर्थसंकल्प अधिवेशनात शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहातच गणपतीची आरती करुन सरकारचे लक्ष वेधण्याचे ठरविले. हे आंदोलन शिवसेना प्रेरित होते. मात्र तत्कालीन भाजपाचे आमदार प्रा.राम शिंदे यांचा आक्रमक स्वभाव असल्यामुळे त्यांनी या आंदोलनात उडी घेतली. यावेळी शिवसेनेचे 12 व भाजपचे आ.राम शिंदे या 13 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. हे आंदोलन फक्त शिवसेनेचे होते, मात्र तुमच्या सहभागामुळे शिवसेना-भाजप युतीचे आंदोलन झाले व आमदार निलंबित झाले. अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. 
आमच्या बरोबर तुम्ही त्यावेळीही होता त्यानंतर अहमदनगरच्या शिवसेनच्या महापौर सौ.शिलाताई शिंदे यांच्या महत्वकांक्षी फेज-2 च्या प्रकल्पाचे उद्घाटन नगरमध्ये झाले होते. त्यावेळी महापौर शिलाताई शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.एकनाथ शिंदे व प्रमुख उपस्थिती आ.प्रा.राम शिंदे असा शिंदेशाहीचा कार्यक्रमही नगरमध्ये पार पडला होता. या दोन्ही आठवणींना उजाळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. 
-

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post