भरधाव डंपरखाली १९ मेंढ्यांचा चिरडून मृत्यू तर २५ मेंढ्या जायबंदी
अहमदनगर(प्रतिनिधी) नगर-औरंगाबाद रस्त्यावर पोखर्डी गावाजवळ भरधाव वेगाणे जाणा-या खडीच्या डंपर खाली (एम एच १६ ए वाय ६५९९ ) चिरडुन १९ मेंढ्यांचा मृत्यु झाला तर २५ मेंढ्या जायबंदी झाल्याची घटना आज दुपारी ४ च्या सुमारास घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचा ताफा ताबडतोब घटनास्थळी पोहोचला असुन गुन्हा नोंदविण्याचे काम चालु आहे. तत्पुर्वी ज्या डंपरखाली मेंढ्या चिरडल्या गेल्या त्या डंपरच्या चालकाचा डंपरवरील ताबा सुटुन डंपर रस्ता दुभाजकावर चढला सबंध रस्ताभर मेंढ्याच्या मांसाचा खच पडलेला होता.
या घटनेमुळे नगर- औरंगाबाद महामार्गावरील वहातुक ठप्प झाली होती त्यावेळी स्थानिक रहिवासी जगन्नाथ निमसे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वहातुक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलीसांना मदत केली.
मेंढ्यांचे कळप हे पुरंदर तालुक्यातील रहिवासी असून ते मेंढ्यांच्या कळपासह नाशिकला मेंढ्या चरायला गेले होते. येतांना ते मनमाड-औरंगाबाद रस्त्याने नगर मार्गे पुण्याकडे चालले होते.मात्र नगर औरंगाबाद रस्त्यावर त्यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. या अपघातामुळे या धनगर मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.दरम्यान या घटनेची माहिती समजताच यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर, धनगर समाजाचे नेते इंजि डी .आर. शेंडगे, निशांत दातीर,मेंढपाळ संघटनेचे नेते गणेश हाके,ऋषी ढवण, आदींनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा केली.
Post a Comment